देहूगाव : येथील जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंढरीनाथ गोपाळ मोरे यांची निवड झाली. त्यांनी प्रतिस्पर्धी राजाराम गोविंद मोरे यांचा ७२ मतांनी पराभव केला. विश्वस्त पदाच्या रिक्त जागेसाठीच्या निवडणुकीत विठ्ठल बाबूराव मोरे निवडून आले आहेत.पंढरीनाथ मोरे यांची निवड पुढील दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी श्री संत तुकाराम महाराज वंशातील तीन शाखा मिळून ३५४ मतदार होते. त्यातील ३१७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांपैकी पंढरीनाथ मोरे यांना १९३, तर राजाराम मोरे यांना ११८ मते मिळाली. पाच मते बाद झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गोविंद मोरे यांनी काम पाहिले.गणेशबुवा शाखेतून पंढरीनाथ मोरे हे विजयी झाले. त्यांनी यापूर्वी १५ वर्षे विश्वस्तपद भूषविले आहे. श्री संत तुकाराममहाराज वंशाच्या तीन शाखांना प्रत्येकी दोन वर्षे संस्थानाच्या अध्यक्षपदाची संधी असते. तर विश्वस्त हे पद सहा वर्षांसाठी असते. सध्याच्या विश्वस्त मंडळाची दोन वर्षे बाकी आहेत. (वार्ताहर)विश्वस्तपदी विठ्ठल मोरे अशोक बाळकृष्ण मोरे यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. या जागेसाठी विठ्ठल मोरे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड ही निश्चित मानली जात होती. आज त्याच्या निवडीची औपचारीक घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी संजय मोरे यांनी केली.
देहू संस्थान अध्यक्षपदी पंढरीनाथ मोरे यांची निवड
By admin | Published: March 27, 2017 3:07 AM