शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
2
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
3
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
4
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत
5
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
6
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
7
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
8
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
9
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
10
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
11
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
12
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
13
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
14
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
15
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
16
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
17
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
18
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
19
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
20
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Pandharpur Wari 2021 : माऊलींच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम ठरला! यंदाच्या वर्षी 'असा' रंगणार आळंदी ते पंढरपूर वारी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 4:08 PM

अवघ्या चार दिवसांनी माउलींच्या पालखीचे प्रस्थान!  आळंदीत ४ जुलैपर्यंत विनापरवानगी प्रवेश बंद

ठळक मुद्देपोलीस प्रशासनाकडून आळंदीकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिगेटस् लावून नाकाबंदी प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या १०० वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी

आळंदी: आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २ जुलैला सायंकाळी चार वाजता आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याची तयारी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून केली जात आहे. पालखी सोहळ्यापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात प्रस्थान सप्ताह सुरू आहे. यंदाही गतवर्षीप्रमाणेच आषाढी वारी सरकारच्या वतीने घालून दिलेल्या नियमावलीत पार पडणार असून विशेष वाहनाने माऊलींच्या चलपादुका पंढरपूरला जाणार आहेत. 

तत्पूर्वी, पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून आळंदी शहरासह नजीकच्या अकरा गावांमध्ये ४ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून आळंदीकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिगेट लावून नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात विना परवानगी प्रवेशास मज्जाव केला असून नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचा आदेश यापूर्वी जारी करण्यात आला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आलेल्या शंभर वारकऱ्यांची बुधवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चाचणीनंतर 'त्या' वारकऱ्यांना लगतच्या धर्मशाळेत एक दिवस वास्तव्यास ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार सर्व नियमावली पाळून प्रस्थान सोहळा पार पडणार असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे - पाटील व वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी केले आहे.

प्रस्थान कार्यक्रम (दि.२ जुलै)- पहाटे ४ ते ५.३० : घंटानाद, काकडा, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा, दुधारती.- सकाळी ९ ते ११ : वीणा मंडपात कीर्तन - दुपारी १२ ते १२.३० :  गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व महानैवेद्य.सायंकाळी ४ वा : प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ.

सायंकाळी ६ वा. : माऊलींचा सोहळा मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून आजोळघरी मुक्कामी.

प्रस्थाननंतर दि. ३ ते १९ जुलै : आजोळघरी माऊलींच्या पादुकांवर परंपरेनुसार सर्व नैमित्तिक उपचार.

१९ जुलैला : माऊलींच्या चलपादुका सकाळी  १० वाजता एसटी बसने पंढरपूरकडे मार्गस्थ.

१९ ते २४ जुलै : माऊलींच्या पादुका पंढरपूरमध्ये मुक्कामी.

२४ जुलै : पौर्णिमेला काला समाप्तीनंतर पंढरपूरहून आळंदीकडे एसटी बसने परतीचा प्रवास.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार