Pandharpur Wari:"वारकरी म्हणतात, पायी वारी जाऊ द्या; अजितदादा म्हणाले, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 05:48 PM2021-05-28T17:48:57+5:302021-05-28T18:33:16+5:30

पहिल्या लाटेपेक्षा गंभीर परिस्थिती गंभीर आहे.आम्हाला लॉक डाऊन लावण्यात किंवा पालखी सोहळा बंद ठेवण्याची हौस नाही..

Pandharpur Wari : "The emotions of the Warakari regarding Wari will be share with Chief Minister Uddhav thackrey and the final decision will be taken in the next cabinet meeting." : Ajit pawar | Pandharpur Wari:"वारकरी म्हणतात, पायी वारी जाऊ द्या; अजितदादा म्हणाले, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार"

Pandharpur Wari:"वारकरी म्हणतात, पायी वारी जाऊ द्या; अजितदादा म्हणाले, मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार"

Next

पुणे : आषाढी वारी संदर्भात आज पालखी सोहळ्याच्या मान्यवरांना बोलावले होते. बहुतेकांचा आग्रह आहे की कमीत कमी लोकांमध्ये वारी काढतो. परवानगी द्या. पण पुढच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कानावर या भावना घालणार असून त्यातच वारी बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

पुण्यात अजित पवारांनी संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन कण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि.28) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, वारकरी संप्रदायाकडून पायी वारीची मागणीचा आग्रह धरला जात आहे. मात्र,आजही महाराष्ट्रात १८ जिल्हे असे आहेत की तिथे पॅाझिटिव्हची संख्या जास्त आहे. त्यात ती साताऱ्यात जास्त आहे. त्यांचे म्हणणे की आम्ही इतरांना येवु देणार नाही. वारकरी संप्रदाय जे म्हणते ते करतो.पण वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणे गरकेचे आहे.

अजित पवार म्हणाले, पहिल्या लाटेपेक्षा गंभीर परिस्थिती गंभीर आहे.आम्हाला लॉक डाऊन लावण्यात किंवा पालखी सोहळा बंद ठेवण्याची हौस नाही. पण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील हावसे गवसे यांची संख्या मोठी असते. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान रोज टेस्टिंग केले आणि तरी कोरोना संख्या आढळली तर पालखी थांबवता येणार नाही.चांगला निर्णय घ्या.

वारकऱ्यांनी मांडली भूमिका ... 
यावर्षी ५०० लोकांना वारी करायची परवानगी द्यावी अशी भुमिका आम्ही घेतली आहे. ५०० नाही तर २०० वारकऱ्यांला पांडुरंगापासुन दुर रहावे लागत आहे. त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही केली आहे. अंशतः: संचारबंदी लावा. लसीकरण करा . बाकी कोरोना संबंधीचे नियम पाळायला आम्ही तयार आहोत. १४ जुनला पालखी सोहळ्याचे पहिलं प्रस्थान आहे.सर्व संस्थांनी एकमत करुन निवेदन दिले आहे की परवानगी द्यावी.

Web Title: Pandharpur Wari : "The emotions of the Warakari regarding Wari will be share with Chief Minister Uddhav thackrey and the final decision will be taken in the next cabinet meeting." : Ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.