सोमेश्वरनगर - सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे शुक्रवारी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित विठू नामाचा गजर करत सोपानकाका पालखी सोहळयातील पहीले अश्वरिंगण पार पडले. ‘सोपानकाका चरणी, अश्व धावले रिंगणी’ हजारो भावीकांच्या उपस्थीत पालखीतील पहील्या अश्व रिंगणाने उपस्थीतींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.निंबुतचा मुक्काम उरकून हा सोहळा सोेमेश्वरनगरच्या दिशेने रात्रीच्या मुक्कामासाठी विसावला. तत्पुर्वी सोमेश्वरनमगर सोपानकाका पालखीचे पहीले रिंगण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सुरूवातीला काकांच्या पादुकांच्या पालखीने पुर्ण मैदानाला रिंगण मारले. त्यानंतर अश्वाने संपुर्ण मैदानाला तीन वेळा गोल रिंगण घालते. हे पाहणाºयांच्या डोळयांचे पारणे फिटले. यावेळी संपुर्ण मैदान विठू नामाच्या गजराने दणाणून गेले. सोपानकाका पालखी सोहळयात गेल्या वर्षीच्या तुलनेत २० हजार वारकºयांची वाढ झाली आहे. पालखीबरोबर अध्यक्ष गोपाळ महाराज गोसावी, पालखी सोहळा प्रमुख श्रीकांत महाराज गोसावी, यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगणाचा सोहळा पार पडला. दरवर्षीप्रमाणे राजश्री जुन्नरकर हीने संपुर्ण रिंगणाला रांगोळी काढली होती. सकाळी आठ वाजता निंबुत छप्री येथे हा सोहळा सकाळच्या चहा पानसाठी विसावला. शहाजी काकडे, प्रमोद काकडे, लक्ष्मण गोफणे, गौतम काकडे यांनी पालखीचे स्वागत केले.याठिकाणी पुरूषोत्तम जगताप यांच्या हस्ते रथांच्या बैलांचे व अश्वाचे पूजन करण्यात आले. यावेळी निता फरांदे, डॉ. सोमप्रसाद केंजळे, किशोर भोसले, विशाल गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब कदम, डॉ. मनोज खोमणे, बाळासाहेब काकडे, नितीन कुलकर्णी, प्रदिप कणसे आदी मान्यवर उपस्थीत होते.पालखी सोहळ्याला ग्रामस्थांकडून बेसन भाकरीचे जेवणदीड तासाच्या विसाव्यानंतर हा सोहळा सकाळी अकरा वाजता दुपारच्या न्याहरीसाठी वाघळवाडी येथे विसावला. या ठिकाणी सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, अजिंक्य सावंत, गणेश जाधव, महादेव सावंत, विठ्ठल गायकवाड, सतिश सकुंडे, आनंदराव सावंत, कल्याण तुळसे, प्रविण सकुंडे, किरण गायकवाड, किसन सकुंडे, हेमंत गायकवाड, ग्रामसेवक सुभाष चौधर आदी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळयाला ग्रामस्थांच्या वतीने बेसन भाकरीचे दुपारचे जेवण देण्यात आले. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी दुपारी ३ वाजता अश्वरिंगणासाठी मुसा काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर आला.
‘सोपानकाकांच्या चरणी, अश्व धावले रिंगणी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:27 AM