Pandharpur Wari : आषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 03:46 PM2021-06-19T15:46:59+5:302021-06-19T15:47:30+5:30

मागील वर्षीच्या वारी इतकं कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

Pandharpur Wari: Thoughts to bring more relaxation in Ashadi Wari celebrations: Deputy Chief Minister Ajit Pawar's statement | Pandharpur Wari : आषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य

Pandharpur Wari : आषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य

googlenewsNext

पुणे : आषाढी वारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.आणि त्याचे आदेश देखील काढण्यात आला आहे. वारी आणि वारकरी समाजाबाबत आम्हाला आदर व प्रेमच आहे. परंतु, सध्याची कोरोना परिस्थिती देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील वर्षीच्या वारी इतकं कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता त्यात मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

पुण्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

पवार म्हणाले, पायी वारीबाबत निर्णय घेण्याआधी देहू,आळंदीसह इतर मानाच्या प्रमुख पालख्यांच्या प्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना वारी सोहळ्यासाठी आवश्यक ती सगळी तयारी करण्यास सांगितले आहे. यावेळी लोकप्रतिनिधी,प्रशासन यंत्रणा किंवा वारी मार्गावरील ग्रामस्थांनी कोरोना परिस्थितीमुळे पायी वारी सोहळ्याऐवजी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बसने वारी सोहळा आयोजित करण्याची मागणी केली आहे. तसेच पंढरपूर येथील प्रशासन यंत्रणांनी देखील कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस झालेल्यांनाच पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर सुद्धा वारी सोहळ्याबाबत ताणाताणी सुरु आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा सुरु असून या परिस्थितीत आषाढी वारीबाबत काही मध्यम मार्ग निघू शकतो यावर विचार सुरु आहे. 

राजगड रोपवेला विरोध करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं 

सिद्धटेक जीर्णोद्धार असो किंवा रायगड रोप वे याकामांना देखील सुरुवातीला विरोध झाला. मात्र कोणताही निर्णय घेताना तो सर्वसमावेशक असावा याचा विचार केलेला असतो. कधीतरी वयोवृद्ध माणसांना देखील शिवाजी महाराजांच्या इतिहास जाणून घेण्याकरिता ऐतिहासिक गड किल्ल्यांना भेटी द्याव्या वाटतात.त्यांच्यासाठीच रोपवेचा पर्याय आहे.पण एक लक्षात घेतले पाहिजे, आज जे राजगड रोपवेला विरोध करत आहे किंवा चढून गडांवर जात आहे. कधीतरी ते सुद्धा ६० वर्षांचे होणार आहे. तरीसुद्धा ज्यांचा विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे अजित पवारांनी सांगितले.

Web Title: Pandharpur Wari: Thoughts to bring more relaxation in Ashadi Wari celebrations: Deputy Chief Minister Ajit Pawar's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.