शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल
4
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
5
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
6
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
7
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
8
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
9
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
10
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
11
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
12
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
13
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
14
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
15
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
16
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
17
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
18
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
19
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
20
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान

आषाढीची पंढरपूर वारी ‘आयटी’त

By admin | Published: July 08, 2015 1:59 AM

शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या पंढरपुरच्या वारीचा अनुभव माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरूण-तरूणींना घेता यावा यासाठी चक्क काही तंत्रज्ञांनी एकत्रित येत आॅनलाईन नोंदणीस सुरूवात केली आहे

पुणे : शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या पंढरपुरच्या वारीचा अनुभव माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरूण-तरूणींना घेता यावा यासाठी चक्क काही तंत्रज्ञांनी एकत्रित येत आॅनलाईन नोंदणीस सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसात ६०० जणांना यात आॅनलाईन नोंदणी केली आहे.हरी नामाचा जयघोष करीत देहू व आळंदी येथून निघणारी वारी पंढरपूरकडे जाते. या परंपरेकडे आता उच्च पदावर काम करणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तरूण-तरूणी आकर्षित होत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात वारीमध्ये आयटीयन्सचा सहभाग वाढू लागला आहे. पण सहभागी होणारे बहुतांशी आयटीयन्स हे महाराष्ट्रीयन आहेत. ज्यांना वारीचे महत्व माहिती आहे. पुणे आयटी हब म्हणून उदयास आल्यानंतर येथील कंपन्यांमध्ये महाराष्ट्राबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून नोकरीसाठी येणाऱ्या तरूण-तरूणींचे प्रमाण मोठे असल्याचे चित्र आहे. त्यांना महाराष्ट्राच्या या वैभवाची, परंपरेची माहिती द्यावी, त्यांना ती अनुभवता यावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बाहेरच्या राज्यातील आयटीयन्सला वारीत कसे सहभागी व्हावे, त्याचा इतिहास काय आहे, याची माहिती नसल्याने त्यांना सहभागी होता येत नाही. हे ओळखून त्यांच्यासाठी खास आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. याबाबत आयटी दिंडीचे राजेश पाटील म्हणाले, ‘‘गेल्या ४ वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवित आहे. पहिल्या वर्षी साधारणत: ७ ते ८ आयटीयन्सच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली. अवघ्या ४ वर्षात ही संख्या ६०० पर्यंत वाढली आहे. आयटी, बीपीओ क्षेत्रात काम करणाऱ्यांना खूप ताण-तणाव सहन करावा लागत असतो. तो कमी व्हावा आणि त्यांना निळख आनंद मिळावा यासाठी वारी हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे आम्ही हा उपक्रम सुरू केला. त्यात परराज्यातील तरूण-तरूणींच्या सहभागाचे प्रमाणही मोठे आहे. (प्रतिनिधी)