लोकमत न्यूज नेटवर्कपाटेठाण : ‘‘श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना ही परिसरातील उस उत्पादक शेतकरी सभासदांची कौटुंबिक संस्था आहे. व्यवस्थापन, शेतकरी, पदाधिकारी व कामगार वर्ग यांच्या १३ वर्षे झालेल्या उत्तम समन्वयातूनच कारखाना प्रगती पथावर आहे. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत चालू गळीत हंगामातदेखील जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने बाजारभाव देण्यात कमी पडणार नाही,’’ असे मत श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी सांगितले. पाटेठाण (ता.दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचा चौदावा बॉयलर अग्यनिप्रदिपन शेतकरी रवींद्र भुजबळ व ज्योती भुजबळ यांच्या हस्ते, ह.भ.प.सदगुरु सुमंत बापू हंबीर महाराज यांच्या अधिपत्याखाली तसेच भगवान मेमाणे व विमल मेमाणे यांच्या सह परीसरातील महिला उस उत्पादकांच्या हस्ते पार पडला. यावेळी पांडुरंग राऊत बोलत होते. यावेळी सुमंत बापू हंबीर, माजी सभापती बाळासाहेब थोरात, माजी जि.प.सदस्या जयश्री दिवेकर, जनसेवा बँकेचे अध्यक्ष प्रदिप जगताप यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी कार्याध्यक्ष विकास रासकर, प्रेमराज बोथरा,पांडुरंग कदम, माधव राऊत, किसन शिंदे, अनिल भुजबळ, तात्यासाहेब ताम्हाणे,माऊली शिंदे, डॉ. सुभाष शिंदे, बन्सीलाल फडतरे,आशा मांढरे,मनिषा नवले यांच्यासह परीसरातील उसत्पादक शेतकर उपस्थित होते.राऊत म्हणाले, कारखान्याच्या प्रगती मध्ये जनसेवा बँकेचे विशेष आर्थिक पाठबळ लाभले आहे. कारखान्याने विविध प्रकल्प कार्यान्वित केले आहे. शेतकरी वगार्साठी परीसंवाद, शैक्षणिक बांधीलकी म्हणून वसतिगृह, आरोग्य शिबिर, गोशाळा उपक्रम राबविले जात आहे.प्रस्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी केले. सुत्रसंचालन सरव्यवस्थापकप्रकाश मते यांनी केले. उपाध्यक्ष बबनराव गायकवाड यांनी आभार मानले.
इतर कारखान्यांच्या बरोबरीने बाजारभाव देणार - पांडुरंग राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 2:38 AM