शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

आतेभावाचा त्रास; युवतीची आत्महत्या

By admin | Published: July 05, 2017 3:33 AM

आतेभावाने ‘लग्न कर नाहीतर बघून घेईन’ अशी धमकी देत शिवीगाळ व मारहाण करण्यात आलेल्या १७ वर्षीय मुलीने रेल्वे खाली येऊन

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आतेभावाने ‘लग्न कर नाहीतर बघून घेईन’ अशी धमकी देत शिवीगाळ व मारहाण करण्यात आलेल्या १७ वर्षीय मुलीने रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ३१ मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अश्विनी तानाजी परदेशी (वय १७, रा. डॉ. बाळासाहेब हरपळेनगर, कचरा डेपोजवळ, फुरसुंगी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ जगताप (वय २५, रा. सातववाडी, सासवड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोमल परदेशी (वय ३२, रा. हरपळेनगर, फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सोमनाथ हा कोमल परदेशी यांच्या सावत्र नणंदेचा मुलगा आहे. त्याचे सासवड रस्त्यावर दुकान आहे, तर अश्विनी नववीमध्ये शिकण्यास होती. आरोपी अश्विनीसोबत लग्न करण्यासाठी तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकीत होता. त्याने कोमल यांना ‘तुमच्या मुलीशी माझे लग्न लावून द्या, नाहीतर मी तुम्हाला बघून घेतो. मी कोण आहे हे दाखवून देईन.’ अशी धमकी दिली होती. त्याने अश्विनी हिला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या त्रासाला कंटाळून तिने ३१ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास हडपसरमधील काळेपडळ रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी १६ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा तपासासाठी हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक लोणारे करीत आहेत.