सनी शंकर जाधव (वय २२, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी) आणि ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय २३, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
जाधव याच्यावर बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोयता, रॉड, टामी यासारखे हत्यारे बाळगून खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या ४ वर्षात त्याच्याविरुद्ध एकूण १२ गुन्हे नोंदविले आहेत. त्याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी पाठवला होता.
लोंढे याच्यावर सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सरकारी नोकरावर हल्ला, खुनाचा प्रयत्न, हत्यारे बाळगणे अशा प्रकारचे गेल्या ६ वर्षांत ११ गुन्हे दाखल आहेत. त्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांनी प्रस्ताव पाठवला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन्ही प्रस्तावांची पडताळणी करून स्थानबद्धतेचे आदेश दिले.
या वर्षात ११ गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले असून गेल्या २ महिन्यात ६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आगामी काळात जास्तीत जास्त सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी सांगितले.