शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भोसरीत हवेत कोयता फिरवत दहशत, दुकानांची तोडफोड; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 2:59 PM

चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल...

पिंपरी : दुकानांमध्ये घुसून कोयता आणि हॉकी स्टिकने तोडफोड करण्यात आली. तसेच एका दुकानातील दोन हजार ६०० रुपये चोरून हवेत कोयता फिरवून सात ते नऊ जणांच्या टोळक्याने दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि.२६) रात्री नऊच्या सुमारास सद्गुरुनगर, भोसरी येथे घडली. या प्रकरणी प्रेषीत गणेश मोरे (वय २३, रा. भोसरी) यांनी गुरुवारी (दि.१७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विजय चव्हाण, पंकज शर्मा, अजय विरेंद्र चव्हाण (वय १८, रा. भोसरी), निलेश साळवी यांच्यासह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी अजय चव्हाण याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ‘आई डेअरी’ या दुकानात काम करत असताना विजय चव्हाण, पंकज शर्मा यांनी तेथे येवून फिर्यादीवर कोयता उगारला. तसेच दुकानातील दोन हजार ६०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले. तसेच आरोपी व त्याचे साथीदार अजय चव्हाण, निलेश साळवे आणि इतर आरोपींनी सदगुरु नगर परिसरातील इतर दुकानांमध्ये कोयता तसेच हॉकीस्टॉकच्या सहाय्याने तोडफोड केली. तसेच कोयो हॉकीस्टीक हवेत भिरकवत दहशत निर्माण केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड