जागतिक स्नूकर स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा बाबर मसिह याच्याविरुद्ध पंकज अडवाणीने ७-५ असा शानदार विजय मिळवला. सामन्यात २-६ अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या बाबरने ५-६ असे पुनरागमन केले होते. परंतु पंकजने आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद पटकावले. तसेच आशियाई सिक्स रेड स्नूकर स्पर्धेत पंकजने इराणच्या आमिर सरखोशचा ६-३ असा पराभव करून विजतेपदाला गवसणी घातली. त्याचे आशियाई स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक असून, याआधी २०१९मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.
बिलियर्ड्स (वेळ व गुण फॉरमॅट)च्या सर्व प्रकारात विजेतेपद पटकावणारा पंकज हा जगातील एकमेव खेळाडू असून, स्नूकर प्रकारातदेखील त्याने विजेतेपद पटकावले आहे. स्नूकर संघटनेचे अध्यक्ष राजन खिंवसरा म्हणाले, पंकजची कामगिरी संस्मरणीय आहे. क्यू क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी पंकजकडे अनेक योजना आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्नूकरपटूंची कामगिरी आणखी सुधारण्यास मदत होणार आहे.
फोटो - पंकज अडवाणी