भामचंद्र डोंगर '''' क '''' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथे भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या प्रादेशिक पाणी योजनेतून पाणी पुरवठा करणारी योजना १५ लक्ष रुपये खर्च करुन पूर्ण करण्यात आली आहे. त्यामूळे या पाणपोईला बारमाही पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध राहणार आहे.१.६७ लक्ष रूपये खर्च करून अतिशय देखणी पाणपोई बांधण्यात आली आहे. एकावेळी दहा भाविकांना पाणी पिता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून मागील बाजूस येथे अखंड हरिनाम सप्ताहच्या निमित्ताने मुक्कामी राहणाऱ्या वारकऱ्यांना आंघोळीसाठी स्नानगृह करण्यात आले आहे.
स्वर्गीय संतोष शेळके यांच्या स्मरणार्थ मित्रमंडळाने मिळवलेल्या निधीतून गेली आठ वर्ष परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देखील वितरीत करण्यात आले होते.
बँकांचे ठेवीवरील व्याजदर कमी झाल्याने एकत्र निधीतून ही पाणपोई बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील काही दिवसात याठिकाणी वारकरी विद्यार्थ्यांचे वर्ग आणि अद्यावत संत साहित्याचे ग्रंथालय होणार असल्याने पाणपोईचा यासाठी मोठा उपयोग होणार आहे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.या पाणपोईचे काम पूर्ण करण्यासाठी अंकुश शेळके, सोमनाथ शेळके, किसन पिंजन,दत्ता लांडगे, दत्ता घुले, उद्धव महाराज यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
-------------------------------------------------------
२९आंबेठाण पाणपोई
फोटो - भामचंद्र डोंगर पायथ्याशी उभारण्यात आलेली सुंदर पाणपोई.