शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

पुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 9:49 AM

शिवाजीनगर भागातील दळवी हॉस्पिटलसमोरील गोदाम व त्याला लागून असलेल्या प्रिंटींग प्रेसला मध्यरात्री लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मुत्यू झाला.

पुणे- शिवाजीनगर भागातील दळवी हॉस्पिटलसमोरील गोदाम व त्याला लागून असलेल्या प्रिंटींग प्रेसला मध्यरात्री लागलेल्या आगीत 2 कामगारांचा मुत्यू झाला. लक्ष्मण राम सुतार (वय 33 ) आणि नरपतसिंग राजपूत ( वय 33) अशी त्यांची नावे आहेत. हिमालय हाईट या इमारतीतील गाळे आहेत. मिठाईसाठी लागणाऱ्या बॉक्स बनविण्याचे काम तेथे चालते. त्याच्या अंतर्गत आतील बाजूला प्रिंटींग प्रेस आहे. मध्यरात्री 3 च्या सुमारास या बंद गाळ्याला आग लागली. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या व एक टँकर यांनी ही आग विझविण्यास सुरुवात केली, बंद गेल्याचे शटर जेसीबीने तोडले व आग विझविण्यास सुरवात केली तेंव्हा आतील बाजूला 2 कामगार अडकल्याची माहिती मिळाली. तिकडे अग्निशमन च्या जवानांनी सर्व पाण्याचा मारा करून जळालेल्या अवस्थेत 2 ना बाहेर काढले. पण त्याचा मुत्यू झाला. आगीवर एक तासात नियंत्रण मिळविण्यात आले. सुमारे 4 तास हे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. प्रेस मध्ये झोपलेले दोन्ही कामगार हे फर्निचर चे काम करत होते. व सध्या निगडीला रहात असून काल प्रेसमध्ये झोपले असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

टॅग्स :Puneपुणेfireआग