लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या मेकॅनिकल शाखेच्या इंजिनिअरिंग मेटलर्जी (धातुशास्त्र) या विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा शुक्रवारी सुरू होती. परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थ्याकडे प्रश्नपत्रिकेतील तंतोतंत प्रश्न आढळून आले आहेत. अभियांत्रिकीच्या काही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे बुधवारी उघडकीस आले होते. या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्या होत्या. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असून दोन महाविद्यालयांना विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. हा प्रकार ताजा असतानाच शुक्रवारी इंजिनिअरिंग मेटॅलर्जी या विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या विषयाची परीक्षा सुरू असताना एका परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळून आला. त्याच्याकडे सापडलेल्या कॉपीमध्ये मूळ प्रश्नपत्रिकेत असलेल्या प्रश्न क्रमांक व त्याचे उत्तर होते. त्यानुसार परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती, असे सूत्रांनी सांगितले.
पेपरफुटीचे सत्र सुरूच?
By admin | Published: May 27, 2017 1:37 AM