भिगवण : भारतीय सैन्य दलातील ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंटच्या सैनिकांनी इंदापूर तालुक्यातील कुंभारगावमध्ये रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पॅराग्लायडिंग केले. या वेळी जवानांनी अवकाशात हवाई उड्डाण करत कुंभारगावावर पुष्पवृष्टी करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी १ एप्रिल १९४३ मध्ये ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंट स्थापन करण्यात आली. १ एप्रिल २०१८ रोजी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात कुंभारगाव येथे करण्यात आली. ७५ वर्षांचा इतिहास असणाऱ्या या रेजिमेंटच्या जवानांनी कुंभारगाव येथे भीमा नदीच्या जलाशयाशेजारी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी पॅराग्लायडिंग कसे असते, याविषयी शाळकरी मुलांसह अनेकांना उत्सुकता होती. त्यामुळे हे जवान आकाशात उड्डाण कसे करतात, याकडे बारकाईने लक्ष देऊन होते. सकाळी नऊच्या सुमारास या मोहिमेला सुरुवात झाली. ९ पॅराशूट फिल्डच्या २ जवानांनी अवकाशात उड्डाण घेतले अन् शाळकरी मुलांनी एकच जल्लोष केला. अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये धाडस निर्माण होऊन या सेवेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी होणार आहे. या अभियानामध्ये भारतीय सेनेचे निवृत्त अधिकारी प्रकाश नेरुरकर, वसंत पाटील, कर्नल रमेश आपटे यांच्यासह २० जवान सहभागी झाले आहेत. या अभियानाचे नेतृत्व बिकेश चौहान, मेजर राहुल शर्मा, हवालदार अमरितपाल, चंद्रकांत महाडिक, रामशेट आदी सहभागी झाले आहेत. कुंभारगाव येथून या मोहिमेला सुरुवात झाली असून आग्रा येथे याची सांगता होणार आहे. ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंटचे पॅरामीटर पायलट या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत. हे धाडसी कार्य भारतीय सेनेच्या आर्मी अॅडव्हेन्चर विंगद्वारे करण्यात येते. पॅरामीटरची ही रॅली १ हजार ४५३ किमीची असणार असून हे अंतर अवकाशातून पूर्ण केले जाणार आहे. नाशिक, धुळे, महू, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर या भागातून हे अभियान होत आहे. २० मार्च रोजी या अभियानाची सांगता आग्रा या ठिकाणी होत आहे. - प्रकाश नेरुरकर, सेवानिवृत्त कॅप्टन
इंदापूर तालुक्यातील कुंभारगावावर पॅराग्लायडर्सने पुष्पवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 2:45 PM
इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी १ एप्रिल १९४३ मध्ये ९ पॅराशूट फिल्ड रेजिमेंट स्थापन करण्यात आली.
ठळक मुद्दे१ एप्रिल २०१८ रोजी या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात कुंभारगाव येथे करण्यात आली. अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांमध्ये धाडस निर्माण होऊन या सेवेत दाखल होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी होणार आहे.