बिबवेवाडी : वाणी भूषण प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांचा १ आॅगस्ट रोजी ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन बिबवेवाडी श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.२३ तारखेपासूनच या अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज ३१ रोजी शोभा रसिकलाल धारीवाल यांच्या अध्यक्षतेखाली महिला मंडळ व सुशील बहुमंडळ यांचे अधिवेशन होणार आहे. सकाळी ९ ला सुरु होणाºया या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. १ आॅगस्ट रोजी म्हणजे उद्या प. पू. प्रीतीसुधाजी म. सा. यांच्या ७५ व्या वाढदिवसा दिवशी त्यांचे गुणगाण करण्यासाठी पुण्यामध्ये चातुमार्सासाठी उपस्थित असलेले अनेक साधु-संत, लोकमत समुहाचे प्रमुख विजयबाबू दर्डा, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार दिलीप गांधी, पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, उद्योगपती रसिकलाल धारीवाल, शोभा धारीवाल, माणिकचंद दुगड, विजय भंडारी, राजेश सांकला, मोहनलाल चोपडा यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, माणिक दुगड, रमेशलाल गुगळे, प्रवीण चोरबेले, गणेश ओसवाल, चंद्रकात लुंकड यांच्यासह संघाचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.
प्रीतिसुधाजी म. सा. यांचा अमृत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:39 AM