पुणे : शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून झालेल्या अमानुष मारहाणीत मुलाला अर्धांगवायूचा झटका आला असून, त्याच्यावर बारामती येथे उपचार करण्यात येत आहे़ याप्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी चित्रकला शिक्षकाला अटक केली आहे.
संदीप विनायक गाडे असे या चित्रकला शिक्षकाचे नाव आहे़ दरम्यान, शाळेने शिक्षकाला निलंबित केले आहे़ याप्रकरणी शैलेंद्र शंकरराव पाटील (रा़ जाब, ता़ इंदापूर) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले की, शैलेंद्र पाटील यांचा मुलगा प्रसन्न पाटील (वय ११) हा एसएसपीएमएस या शाळेत सहावी इयत्तेत शिकत आहे़ त्याला या वर्षीच या शाळेत घालण्यात आले आहे़ त्याचा मोठा भाऊ याच शाळेत दोन वर्षांपासून शिकत आहे़ दोघेही वसतिगृहात राहतात.
दिवाळीची सुट्टी लागल्यानंतर त्याच्या आईशी बोलताना त्याचे तोंड वाकडे होत होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी बारामती येथील हॉस्पिटलला गेल्यावर त्याने घडला प्रकार सांगितले़ ही घटना साधारण १५ ते २५ आॅक्टोबरला घडली़ प्रसन्नचे चित्रकलेचे दोन गृहपाठ अपूर्ण होते व त्याची चित्रकलेची फाईल फाटली होती़ या कारणावरून संदीप गाडे यांनी त्याचे हात बेंचवर ठेवून त्यावरवरून मारले़ तसेच त्याच्या तोंडावर, डोक्यात मारहाण केली़ काखेमध्ये चिमटे काढले, असे सांगितले़ यामुळे प्रसन्न प्रचंड घाबरलेला होता़ तो मित्राच्या वाढदिवसालाही गेला नाही़ प्रसन्नमध्ये ‘बेल पालसी’ची लक्षणे दिसत असल्याने त्याला पुण्याला अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले़शैलेंद्र पाटील यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संदीप गाडे यांच्यावर मारहाण करणे, तसेच बाल संरक्षण अधिनियम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे़याबाबत प्रसन्नचे वडील शैलेंद्र पाटील यांनी सांगितले की, ३ नोव्हेंबरला भेटायला गेलो तेव्हा बोलताना त्याचे तोंड वाकडे होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले़ त्याबाबत विचारले असता सरांनी मारल्याचे सांगितले़ सरांनी अगदी हात बेंचवर ठेवून जोरात कानाखाली मारले़ तसेच पोटात चिमटेही काढले़ आम्ही त्याला बारामतीतील हॉस्पिटलमध्ये नेले़ त्याला पुढील तपासणीसाठी पुण्याला आणले आहे़ हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर, मुख्याध्यापकांकडे गेलो़ त्यांनी याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करू, असे आश्वासन दिले आहे़ संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे़दरम्यान, शाळेत असतानाच विद्यार्थ्याला त्रास होत होता. मात्र, शाळा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही पालकांनी केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पालक सोमवारी शाळेत गेले होते़शाळेने गाडे यांचे निलंबन केले असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील यांनी सांगितले. तसेच, समितीचा अहवाल आल्यानंतर समितीच्या निर्देशानुसार गाडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.बेल पाल्सी म्हणजे काय?४बेलच्या पक्षाघातमुळे आपल्या चेहऱ्यावरील स्नायूंमध्ये अचानक,तात्पुरती कमकुवतता येते. यामुळे आपला चेहरा अर्धवट दिसतो. आपलेहसणे एक-बाजूचे आहे आणि त्या बाजूला आपले डोळे बंद होण्यासविरोध करते.४बेलच्या पक्षाघात, चेहºयावरील पक्षाघात म्हणून ओळखले जाते, कोणत्याही वयात येऊ शकते. अचूक कारण अज्ञात आहे. हे आपल्या चेहºयाच्या एका बाजूला स्नायू नियंत्रित करते की सूज आणि सूज वेदना होऊ शकते असे मानले जाते. किंवा ही एक प्रतिक्रिया असू शकते जी व्हायरल इन्फेक्शननंतर येते.४महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनविसे) शिक्षकावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.प्रसन्न पाटील याची येथे तपासणी केल्यानंतर त्याच्यात ‘बेल पाल्सी’ आजाराची लक्षणे दिसून आली़ लहान मुलांवरील अशा प्रकारच्या आजाराबाबत अधिक तपासणीसाठी त्याला पुण्यात पाठविण्यात आले आहे़ - डॉ़ राजेंद्र मुथा, बारामती