राजुरी : ‘‘आई-वडिलांची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा करणे होय. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांना दैवतच मानले पाहिजे,’’ असे प्रतिपादन डॉ. विकासानंदमहाराज मिसाळ बोरी बुद्रुक येथे काढले.बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील श्री मुक्कामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा दहावा वर्धापन व इमामबाबा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्री मुक्कामातेचा व इनामबाबांचा अभिषेक, तसेच मांडवडहाळे व रात्री डॉ. विकासानंदमहाराज मिसाळ यांची कीर्तनसेवा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. मिसाळमहाराज कीर्तनात म्हणाले, की आजचा तरुण व्यसनाच्या आहारी जास्त जाऊ लागला आहे, त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. या वेळी राजाराममहाराज जाधव, विकासानंदमहाराज मिसाळ यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. (वार्ताहर)
आई-वडिलांची सेवा ही ईश्वरसेवा : मिसाळ
By admin | Published: March 22, 2017 2:59 AM