पुणे : केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर उन्हाळी सुटीतील आहाराचे पैसे जमा केले जाणार आहेत. त्यासाठी मुलांच्या नावाने बँक खाते उघडण्याच्या सूचना शिक्षण विभागाने काढल्या आहेत. मात्र, खाते उघडण्यास पालकांच्या उदासीन भूमिकेमुळे अल्पप्रतिसाद मिळत आहे. यामुळे या योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण सहा लाख ९३ हजार ९८९ मुलांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, केवळ दोन लाख ७७ हजार ९८७ विद्यार्थ्यांनीच खाते उघडले आहे.
शिक्षण विभागाने शाळास्तरावर खाते उघडण्याच्या सूचना केल्या आहेत. उन्हाळी सुटीचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या नावावर जमा करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. खाते उघडण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव केली जात आहे. मात्र, अनेक पालकांनी खाते उघडण्याबाबत अनुत्सुक आहेत. या योजनेद्वारे कुणाच्या खात्यावर १५०, तर कुण्याच्या खात्यावर २५० रुपये जमा होणार आहे. एवढ्या किरकोळ रक्कमेसाठी आम्ही खाते का उघडावे, अशी भूमिका पालकांची आहे. त्यात बॅंकेकडूनही त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या योजनेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळणे कठीण झाले आहे.
चौकट
या योजनांच्या लाभासाठी खाते आवश्यक...
उन्हाळी सुटीतील पोषण आहाराचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत.
शिष्यवृत्ती तसेच इतर याेजनांचे पैसे जमा करण्यास बँकेत खाते गरजेचे असते.
जिल्ह्यात खाते उघडण्यास विद्यार्थी पालकांचा अल्पप्रतिसाद आहे.
जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्थिती
जि.प. शाळा - --
विद्यार्थिसंख्या - --
कागपत्रांसाठी पालकांची होतेय धावपळ...
पोषण आहाराचे पैसे खात्यात जमा होण्यासाठी बँकेचे खाते आवश्यक आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांचे खाते नसल्याने बँकेत खाते उघडण्यासाठी पालकांची धावपळ होत आहे. कागपत्रांची जमवाजमव केली जात आहे. दरम्यान, काही ठिकाणी बँकांमध्ये गर्दी होत आहे.
पालकांना येणाऱ्या अडचणी काय..
खाते उघडण्यासाठी कागदपत्रे काढण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागत आहे.
कोरोनामुळे बँकेत नियमांचे पालन करीत खाते उघडण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहेे.
शाळांच्या वतीने खाते क्रमांक लवकर द्या, म्हणून विद्यार्थ्यांकडे तगादा सुरू आहे. त्यामुळे लवकर खाते उघडण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. अनेक पालकांनी खाते उघडूनही शाळांना माहिती दिली नाही. त्यामुळे ही यादी अपडेट करण्यास अडचणी येत आहेत.
चौकट
जिल्ह्यात पहिली ते पाचवीच्या चार लाख सहा हजार ८३९ विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे. त्यापैकी केवळ एक लाख ५३ हजार १२० मुलांनी खाते काढले आहेत, तर सहावी ते आठवीच्या दोन लाख ८७ हजार १५० मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यापैकी केवळ एक लाख २४ हजार ८६७ विद्यार्थ्यांनी खाते उघडले आहे.
कागदपत्रांसाठी धावपळ
मुलांच्या नावाने बँकेत खाते काढण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता आहे. मात्र, ही कागदपत्रे जमवताना पालकांची दमछाक होत आहे. काहींकडे अपुरे कागदपत्रे असल्याने खाते काढताना अडचणी येत आहेत.
तालुकानिहाय स्थिती
तालुका पात्र विद्यार्थी खाते उघडलेले
आंबेगाव २०,१५० १०,३३०
बारामती ३९,५३९ २५,०४९
भोर १६,०२२ ८००७
दौंड ३७,२६३ १७,६८५
हवेली ४६,११० १८,४३५
इंदापूर ३९,६०९ २५,०४९
जुन्नर ३३,३५८ १६,९६२
खेड ४७,६६० ३०,८४५
मावळ ३२,५२४ १६,४९८
मुळशी १९,२२६ ४३७६
पुरंदर २१,८५८ १४,५५५
शिरूर ४६,१५७ २२,५१०
वेल्हे ४३२६ १०९८
एकूण ४,०३,८०२ २,११,३९९