- तोहिदा बागगीर पालक,
----------------------
इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आवश्यक दक्षता घेऊन शाळेत जाता येईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थी व शाळांनी आरोग्याची काळजी घेतली तर सध्या सुरू असलेले शैक्षणिक नुकसान टळेल.
- सुभाष आमले, पालक
------------------------------------
पाचशे शाळा, १० लाख विद्यार्थी
“पुणे शहरात सुमारे पाचशे माध्यमिक शाळा असून त्यात तब्बल १० लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. मुख्याध्यापकांनी शहरातील शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक तयारी सुरू केली आहे. सोमवारपासून पुन्हा सर्व शिक्षक स्वत:ची कोरोना चाचणी करून घेतील. वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव बाकावर टाकून अंतर ठेवून त्यांना बसवले जाईल. एक दिवस नववी, एक दिवस दहावी या पध्दतीने सुध्दा शाळा भरवता येईल.”
-हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष,मुख्याध्यापक संघ,पुणे