पुणे : कोरोनामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी)केलेल्या सर्वेक्षणात ५ लाख ६० हजार ८१८ (८१.१८ टक्के) पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. त्यात राज्यातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक २ लाख ८६ हजार ९९० पालक शाळा सुरू करण्यास आग्रही असल्याचे दिसून येत आहे.अनेक पालक शाळा सुरू करण्यास अनुकुल असल्याने राज्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एससीईआरटीच्या सर्वेक्षणात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ७३ हजार ८३८ पालकांनी सहभाग घेतला आहे. तर मुंबई (बीएमसी) मधील ७० हजार ८४२ आणि मुंबई (डीवायडी)मधील ३९ हजार ३५१ पालकांनी सर्व्हेक्षणात सहभाग नोंदवला.सर्वेक्षणात राज्यातील एकूण ८१.१८ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दर्शविला असला तरी १ लाख ३० हजार २ (१८.८२ टक्के) पालकांचा शाळा सुरू करण्यास अजूनही विरोध आहे.
पहिल्या टप्प्यात राज्यातील कोरोना मुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग येत्या १५ जुलैपासून सुरू करण्याबाबत एससीईआरटीतर्फे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. सोमवारी रात्री ११.५५ वाजेपर्यंत या सर्वेक्षणात सहभाग घेण्यास मुदत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणांत मत नोंदवले. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागातील प्रत्येकी ३ लाखाहून अधिक पालकांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्यामुळे अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठवण्यास अनुकुल असल्याचे दिसून येत आहे.परंतु,शासन शाळा सुरू करणार की नाही, हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.
-------------------
विद्यार्थी सुमारे दीड वर्षांपासून आॅनलाईन शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना डोळ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे आता शासकीय नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या पाहिजे. शासनाने प्रत्येक शाळेसाठी लसीकरणासाठी वेगळी तरतुद केली पाहिजे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायाल हवेत. स्थानिक प्रशासनाने सुध्दा शाळा सुरू करण्याबाबत साकारात्मक भूमिका घ्यायला हवी.
- दिलीप सिंग विश्वकर्मा,अध्यक्ष, महापॅरेंटस
------------------------
कोणत्या वगार्तील विद्यार्थ्यांच्या किती पालकांनी नोंदवले मत
नर्सरी : १९,२७३
पहिली ते पाचवी : १,६२,१८४
सहावी ते आठवी : २,१५,५९०
नववी ते दहावी : २,८६,९९०
अकरावी ते बारावी : १,०५,३९२
--------------
सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या राज्यातील पालकांची आकडेवारी
अहमदनगर - ३४,०६७, अकोला - ८,६७८, अमरावती -१६,०५१, औरंगाबाद - १२,९८८, बीड -११,०९६ , भंडारा -६,१९७, बुलढाणा -१४,०७१, चंद्रपूर -१२,८२२, धुळे - ८,०३२, गडचिरोली - ३,१३१ , गोंदिया ६,७३५, हिंगोली -४७१०, जळगाव -१८,७८०, जालना- ८,५८१, कोल्हापूर-३०,४३७ , लातूर १०३०२, मुंबई (बीएमसी) -७०,८४२, मुंबई (डीवायडी)-३९,३५१, नागपूर-१६,४४० , नांदेड - १०,६५१, नंदूरबार -४,४८४, नाशिक -४७,२०२, उस्मानाबाद ८०१३, पालघर - २३,३३९, परभणी - ६,६०९, पुणे- ७३,८३८ , रायगड - १६,६५८ , रत्नागिरी- १३,९६९, सांगली-१७,८३३, सातारा -४१,२३३, सिंधूदूर्ग- ६,८०४ , सोलापूर - २२,२५४, ठाणे -३९,२२१, वर्धा- १०,९९१, वाशिम-५,३७२, यवतमाळ - ९,०२९
----
निवासस्थानाची माहिती देऊन सर्वेक्षणात भाग घेणारे पालक
ग्रामीण - ३,०५,२४५
निमशहरी -७१,९०४
शहरी - ३,१३,६६८
एकूण - ६,९०,८२०
---------