ऋतुजा दळवी आणि ओम हरपुडे हे ८ वीतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अनुक्रमे ६ वे व ९ वे आले. जिल्हा परिषदेचे वतीने त्यांचा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्कार केला. मात्र आपल्या ह्या गुणी विद्यार्थ्यांना आयुष प्रसाद यांची भेट घालून त्यांच्यासमोर एक आदर्श ठेवावा व प्रेरणा द्यावी, असे विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी ठरविले. इतर सर्व गुणवंत सत्कार घेऊन गेले. मात्र ओम व ऋतुजा यांना घेऊन प्राचार्य शिंदे हे आयुष प्रसाद यांच्या दालनाकडे गेले.वर्गशिक्षक धनंजय तळोले,पालक किसन हरपुडे यांच्यासह प्रतीक्षा केल्यानंतर साहेबांच्या दालनात प्रवेश मिळाला.कामात अत्यंत व्यग्र असूनही प्रसाद यांनी मोठ्या आपुलकीने विचारपूस केली. या यशाने हुरळून न जाता खूप अभ्यास करा. ही तर फक्त सुरुवात आहे.घसरण व्हायला वेळ लागत नाही,मात्र यश मिळविताना खूप मेहनत घेणे गरजेचे आहे. असे मौलिक मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची सहजता,आपुलकी आणि नम्रता यामुळे आम्ही सर्व जण खूप भारावून गेलो, अशी भावना प्राचार्य शिंदे,वर्गशिक्षक तळोले व पालक हरपुडे यांनी व्यक्त केली.
कान्हुरमेसाई येथील ओम व ऋतुजा यांचे कौतुक करताना आयुष प्रसाद व बांधकाम समितीचे सभापती प्रमोद काकडे