परिंचे : परिंचे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा जाधव यांच्या वतीने जनता दरबाराचे आयोजन केले होते. त्याला गावातील महिला व ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद देताना तक्रारी व अडचणींच्या अर्जांचा पाऊस पाडला.
यावेळी यादव म्हणाले की, जनता दरबार अंतर्गत शासकीय अधिकारी व ग्रामस्थांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला असून या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रश्न गावपातळीवर मिटवण्यासाठी उपयोग होणार असल्याचे सांगितले. सरपंच ऋतुजा जाधव यांनी गावातील समस्या व अडचणी लोकांनी अर्जाच्या माध्यमातून मांडाव्यात त्यानंतर या बद्दलचा पाठपुरावा ग्रामपंचायत परिंचे यांच्या मार्फत केला जाणार असल्याचे सांगितले. आलेल्या अर्जांची नोंदवही बनविण्यात आलेली असून संबंधित विभागांना सदरची कामे करण्यास भाग पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या जनता दरबारात उपसरपंच दत्तात्रय राऊत, माजी सरपंच समीर जाधव, मयूर मुळीक, पुष्कराज जाधव, पशुधन विकास अधिकारी आर. एन. ठोंबरे, वैद्यकीय अधिकारी स्वप्नाली शिंदे, विद्युत अभियंता योगेश बुरसे, कृषी पर्यवेक्षक एस. एस. किरकोळे, ग्रामपंचायत सदस्य शैला जाधव, वंदना राऊत, पुष्पलता नाईकनवरे, अर्चना राऊत, प्रवीण जाधव, गणेश पारखी, अजित नवले, पांडुरंग जाधव, संभाजी नवले, उल्हास जाधव, लक्ष्मणराव जाधव, बाळासाहेब जाधव, शामकांत जाधव, शशिकांत जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत, तलाठी सुजीत मंडलेचा, कृषी सहायक संदेश समगीर, आरोग्य सेवक प्रकाश चव्हाण, वैशाली भगत, सी. टी. कुदळे, प्रदीप जाधव, दत्तात्रय कांबळे आदी उपस्थित होते. संकेत जाधव यांनी सूत्रसंचालन केले, शशांक सावंत यांनी आभार मानले.