पुणे: महाराष्ट्राच्या कोल्हापूर येथील स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Plympics 2024) ब्राँझपदक मिळविले आहे. ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री-पोझिशनमध्ये त्यांना हे पदक मिळाले असून वैयक्तिक पदक मिळविणारे महाराष्ट्रातील तो दुसरे खेळाडू ठरला आहे. पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर स्वप्नील चे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर स्वप्नील ने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली यावेळी ट्रस्ट कडून स्वप्नील चे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वप्नील म्हणाला की पहिले गणपती बाप्पा मोरया..बाप्पाच्या मुळेच सर्व काही आहे म्हणून पाहिले बाप्पा ला भेटायला आलो आहे. जे मागितलं आहे ते बाप्पाने आजपर्यंत दिलं आहे.अस यावेळी स्वप्नील ने सांगितल आहे.
महाराष्ट्राला वैयक्तिक पदक १९५२ मध्ये खाशाबा जाधव यांच्या रुपाने मिळाले होते. खाशाबा जाधवही कोल्हापुरचे होते, आता १९५२ नंतर पुन्हा एकदा वैयक्तिक पदक मिळवणारा खेळाडू कोल्हापुरचाच आहे. स्वप्नील कुसाळेने जोरदार खेळी केली. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत अखेर कोल्हापुरकरांचं स्वप्न साकार केलं. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कास्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पहिल्यांदाच पदक जिंकले आहे.संपूर्ण भारतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होऊ लागला आहे.