पुणे : सहकार जगताचे लक्ष वेधलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या पंचवर्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रणित सहकार पॅनलचा धुव्वा उडवित राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉंग्रेस प्रणित सहकार पॅनेलने २१ पैकी २० जागा जिंकून पुन्हा एकदा सहकारावरील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले़. राज्यातील सहकार क्षेत्रात मोठे फेरबदल घडविणा-या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत परिवर्तन पँनलने संजीव कुसाळकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पँनलचा धुव्वा उडवत घवघवीत विजय मिळवला आहे. मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावर संघाला यशोशिखरावर नेण्याचा मनोदय कुसाळकर यांनी यावेळी व्यक्त केला. तब्बल ५० वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीत सहकार पँनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही ही विशेष बाब या निवडणुकीत पाहायला मिळाली. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सहकार क्षेत्राबरोबरच राजकारणावरही या निवडणुकीचा दूरगामी परिणाम होणार असल्याचे संकेत या निवडणुकीने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची दि. ६ मार्च रोजी २१ जागांपैकी १० जागांसाठी मतमोजणी झाली. यामध्ये परिवर्तन पॅनलचे १० उमेदवार निवडून आले. तर परिवर्तन पँनलचे १ उमेदवार माधवराव सोनवणे हे राज्यस्तरीय मतदारसंघातून याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर ४ उमेदवारांनी हे विभागीय मतदारसंघातून निवडून आल्यानंतर परिवर्तन पॅनलला पाठिंबा दिला आहे. या निवडणुकीत एकूण २२०० मतदारांपैकी १८०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दर पाच वर्षांनी होणा-या या निवडणूकीने राज्यातील सहकार क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलला प्रत्येक मतदारसंघात परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी धोबीपछाड दिला. मोठ्या मताधिक्याने परिवर्तन पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. राज्यातील सुमारे ७ लाख कुटुंबियांशी थेट संबंधित असलेल्या या क्षेत्रातील ही निवडणूक अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरलेली आहे. राज्याच्या कानाकोप-यात मोठ्या प्रमाणावर संघटन असलेल्या या सहकार क्षेत्राला सत्ताधा-यांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे स्पष्ट संकेत या निवडणूकीच्या निकालाने दिले आहेत. राज्यातील सहकार क्षेत्रात मोठे फेरबदल घडविणा-या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत मतदारांचा विश्वास सार्थ ठरवत परिवर्तन पँनलने संजीव कुसाळकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आमदार प्रवीण दरेकर यांच्या सहकार पँनलचा धुव्वा उडवत घवघवीत विजय मिळवला आहे.परिवर्तन पॅनलचे संजीव कुसाळकर -१११५ मते मिळवून विजयी झाले. तसेच चंद्रकांत जाधव ,सुनील ताटे, मुकुल पोवार, विलास महाजन निवडून सहकार पॅनलच्या नितीन बनकर यांना ८३३ मते मिळाली. तर गोपाळ म्हस्के अनंत लायगुडे, प्रकाश लोणारे, यशवंत सावंत यांचा पराभव झाला.
........................
वंचित सहकार क्षेत्राला न्याय देवू राज्याच्या विकासात कायम महत्त्वाचा वाटा असलेल्या सहकार क्षेत्रातील या घटकाला अपेक्षित न्याय मिळालेला नाही. त्यामुळे मिळालेल्या या मतरूपी आशिवार्दाचा उपयोग या क्षेत्राला ख-या अथार्ने न्याय मिळवून देण्यासाठी करणार आहे. मतदारांच्या भक्कम पाठिंब्यावर संघाला यशोशिखरावर नेणार आहे.
संजीव कुसाळकर