पुणे : पुण्यात वाहतूकीची समस्या दिवसेंदिवस वाढत अाहे. त्यातच वाहनचालाकांमधील शिस्तीच्या अभावामुळे शहरातील विविध रस्त्यांवर वाहतूक काेंंडी हाेत असते. वाकडेवाडी भागातील बजाज शाेरुम समाेरील सर्विस रस्त्यावर नाे पार्किंगचा फलक लावलेला असतानाही वाहनचालक तेथेच वाहने लावत असून या वाहनचालकांवर फारशी कारवाई हाेत नसल्याचे चित्र अाहे. त्यामुळे नाे पार्किंगच्या बाेर्डखालीच अधिकृत पार्किंग अाहे की काय असा प्रश्न निर्माण झाला अाहे.
पुण्यातील रस्त्यांवर दरराेज शेकडाे वाहनांची भर पडत अाहे. पुण्यातील लाेकसंख्येपेक्षा अधिक वाहनांची संख्या झाली अाहे. त्यामुळे शहरात वाहतूकीचा तसेच पार्किंगचा माेठा प्रश्न निर्माण झाला अाहे. पुण्याचे तात्कालिन अायुक्त कुणाल कुमार यांनी पुण्यातील रस्त्यांवर पे अॅण्ड पार्कचा प्रस्ताव अाणला हाेता. जास्तीत जास्त नागरिकांना सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा असा त्यांचा यामागील हेतू हाेता. परंतु या निर्णायाला सर्वच पक्षांनी विराेध केल्याने ताे निर्णय मागे घेण्यात अाला. पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नसल्याने नागरिक खासगी वाहनांचा वापर माेठ्याप्रमाणावर करतात. परिणामी रस्त्यावर माेठ्याप्रमाणावर वाहतूककाेंडी हाेत असते. तसेच पार्किंची माेठी समस्याही यामुळे निर्माण झाली अाहे.
वाकडेवाडी येथे अनेक दुचाकी या सर्विस रस्त्यावर तसेच पदपथावर लावण्यात येत अाहेत. बजाज शाेरुम समाेरील रस्ता हा एक प्रकारे पार्किंगची जागा म्हणूनच वापरण्यात येत अाहे. पदपथावर तसेच सर्विस रस्त्यावर वाहने लावण्यात येत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागत अाहे. येथील रस्ता हा जूना मुंबई-पुणे हायवे असल्याने येथे वाहने वेगात असतात. त्यातच एखाद्या वाहनाचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता अाहे. तसेच येथील सर्विस रस्त्यावर माेठ्याप्रमाणावर वाहने लावण्यात येत असल्याने इतर वाहनांना याचा अडथळा निर्माण हाेत अाहे. येथे नाे पार्किंगचा बाेर्ड लावलेला असताना त्याच्या खालीच वाहने लावण्यात येत अाहेत. वाहतूक पाेलीसांकडून फारशी कारवाई हाेत नसल्याने येथे सर्रास वाहने लावली जातात.