राफेल विमान खरेदीची संयुक्त संसदिय समितीमार्फत चौकशी करावी : काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:58 PM2018-12-26T15:58:51+5:302018-12-26T16:00:48+5:30
राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली.
पुणे : राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली. या संदर्भात पुणे शहर काँग्रेसने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
राफेल विमान खरेदीच्या संदर्भात न्यायालयाने प्रशासन यंत्रणेला क्लीनचिट देऊनही काँग्रेसने आपले आरोप थांबवले नाहीत. इतकचं नव्हे तर काँग्रेसमार्फत राफेलच्या चौकशीची मागणीही वारंवार करण्यात येत आहे. या संदर्भात पुणे शहराध्यक्ष आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत बागवे म्हणाले की, मोदी सरकारने भ्रष्टाचाराचे टोक गाठले असून आता ते सर्वोच्च न्यायालयालाही फसवत आहेत. खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी न्यायालयालाचीच नव्हे तर १३० कोटी जनतेचीही फसवणूक केली आहे. देशातील नागरिकाचा कररूपी पैसा केंद्र सरकार कोणत्या पद्धतीने खर्च करत आहे याची मागणी सरकारने देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.