शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

देशातील महत्त्वाच्या घोटाळ्यांत संसदीय समित्यांचे झाले ' भजे ' : माधव गोडबोले 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:04 PM

गेल्या ७० वर्षात निवडून दिलेले लोकविधायक हे त्याचे फलित म्हणावे का, आजवर ज्या प्रकरणाकरिता संसदीय समिती नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत.

ठळक मुद्देराष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदानदेशातील नागरिकांना याप्रकारच्या संसदीय समित्यांकडून अपेक्षा असताना त्यांचे अपयश खेदजनक

पुणे :  देशभरातील बोफोर्स, हर्षद मेहता बँक घोटाळा आणि टू जी स्पेक्ट्रम घोटाळा मोठमोठ्या घोटाळ्यांकरिता ज्या मोठ्या समिता नेमण्यात आल्या त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न कुणी विचारत नाही. संसदीय समिती नेमायची, त्यानंतर चौकशी अहवाल, मात्र त्यातून फार काही साध्य होत नाही. राफेल प्रकरणी चर्चा केली जाते याचा अर्थ आपण निवडून दिलेल्या सरकारवर आपला विश्वास नाही का, तसेच गेल्या ७० वर्षात निवडून दिलेले लोकविधायक हे त्याचे फलित म्हणावे का, आजवर ज्या प्रकरणाकरिता संसदीय समिती नेमण्यात आल्या त्या एकाही प्रकरणात यशस्वी झाल्या नाहीत. अशाप्रकारे संसदीय समित्यांचे भजे झाले आहे. अशी सणसणीत टीका संसद प्रक्रियेवर माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केली. राष्ट्रीय प्रतिष्ठानच्यावतीने टिळक स्मारक मंदिरात राष्ट्रीय चारित्र्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माधव गोडबोले यांनी भुषविले. याप्रसंगी परमवीर चक्रविजेते संजयकुमार यांना राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबरोबरच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर क्षेत्रातील निवडक विद्यार्थ्यांना शहर पातळीवरील चारित्र्य उपासक छात्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र व पंजाबचे माजी पोलीस महासंचालक एस. एस. विर्क, सरहदच्या विश्वस्त सुषमा नहार, अंकिता शहा, सुभाष मोहीते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.  गोडबोले म्हणाले, बोफोर्सचा घोटाळा, हर्षद मेहता यांचा बँक घोटाळा आणि टू जी स्पेक्ट्रमचा घोटाळा ही देशातील काही प्रमुख घोटाळ्यांची उदाहरणे यात देखील चौकशीकरिता संसदीय समिती नेमण्यात आली. मात्र कालांतराने तपास रेंगाळत गेल्याने त्या समितीकडून म्हणावा तितकासा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. देशातील नागरिकांना याप्रकारच्या समित्यांकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असताना संसदीय समित्यांचे अपयश खेदजनक म्हणावे लागेल. त्यामुळेच संसदीय समितीचे भजे झाले आहे. असे म्हणावे लागते.  ज्यांना देशातील सर्वोच्च अशा पुरस्काराने गौरविण्यात आले अशा माजी राष्ट्रपतींनी देखील पंतप्रधान संसदेला जबाबदार असतात. संसदीय समितीला नव्हे. त्यामुळे त्यांनी अशा समितीला सामोरे जाण्याची गरज नाही. यातून संसदीय समितीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 

* देशातील तरुणांना प्रेरित करायचे असेल तर त्यांना आपल्या सैनिकांच्या युध्दाचा गौरवशाली इतिहास समजून सांगावा लागेल. त्याची गरज आहे. राष्ट्रउभारणीकरिता त्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पिढीला हे सांगावे लागेल जेणेकरुन त्यांच्यात देशभक्ती जागृत होण्यास मदत होईल. देशाविषयी प्रेम व आदराची भावना निर्माण होण्याकरिता इतिहासाचे स्मरण हवेच. असे मत विर्क यांनी व्यक्त केले.   

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारfraudधोकेबाजीParliamentसंसद