वधु वर केंद्र चालक मेळावा पुणे: कोरोनानंतरच्या काळात विवाहाच्या संकल्पनेत आमुलाग्र बदल होत असून सर्वानी त्यादृष्टीने मानसिकता बदलावी, असे मत शहरातील विविध वधु-वर केंद्र संचालकांनी व्यक्त केले. ʻलोकमतʼ ला दिलेल्या अनौपचारीक भेटीत ते बोलत होते. गौरी आणि तन्मय कानिटकर ( अनुरूप विवाह संस्था), रमेश पाटणकर (पाटणकर इव्व्हेंटस), डॉ. राजेंद्र भवाळकर (अक्षदा मॅरेज ब्युरो), श्रीराम कुलकर्णी (देशस्थ ऋग्वेद विवाह मंडळ), विराज तावरे ( मराठा विवाह दरबार), स्वरूपा देवळणकर (शुभविश्व मल्टीसर्विसेस), स्वाती संभूस (स्वाती वधु वर केंद्र), नितीन केळकर (पुणे वधु वर सुचक केंद्र), विद्यानंद मरळ (साथी वधु वर केंद्र), सुरेश पारख (जैन विवाह केंद्र) शीला देऊस्कर ( रेशीमगाठी वधू वर सूचक संस्था), अभिजित जोशी (रोहिणी विवाह संस्था, संस्थापक वसंत काणे), गोरख जाधव (मराठी स्मार्ट जोडीदार वधू वर सूचक मंडळ), वैष्णवी जोगळेकर (सोबती वधू वर सूचक मंडळ) आदींचा समावेश होता. विवाह जमवताना येत असलेल्या अडचणी, कारोनामुळे विवाह समारंभांचे बदललेले स्वरूप, ग्रामीण-शहरी भेद, पुनर्विवाह, ज्येष्ठांचे विवाह, दिव्यांगांचे विवाह अशा विविध मुद्द्यांचा यावेळी संस्था चालकांनी उहापोह केला. इतकेच नव्हे तर बदलत्या परिस्थितीत मार्ग कसा काढता येईल, याबाबतही उपाययोजना सुचवली. तसेच या भकार्यात ʻलोकमतʼने नेहमीप्रमाणे सहकार्याचा हात दिल्यास रेशीमगाठी जुळण्यास चांगलीच मदत होईल, अशीही अपेक्षा व्यक्त केली. ....... गौरी कानिटकर : कोरोनामुळे बदलत्या परिस्थितीत आम्ही ऑनलाइनला जास्तीत जास्त चालना दिली. त्यामुळे, या संबंधांना आपोआप ग्लोबल स्वरूप प्राप्त झाले. लॉकडॉऊन कालावधीत आम्ही मुलं, मुली तसेच पालकांसाठी तब्बल ७० ऑनलाईन कार्यक्रम घेतले. त्यात, लग्नसंवाद, थेट-भेट, घटस्फोटांबाबत समुपदेशन, आदींचा त्यात समावेश होता. लॉकडॉऊन काळातच भावी लग्नांची
वधू वर भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:28 AM