महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व सध्याच्या कोरोनाविषयक परिस्थितीमुळे २५ फेब्रुवारी रोजी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने नियोजित दिवाळी अंक पारितोषिक वितरण समारंभ आणि २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध साहित्य पुरस्कार प्रदान समारंभ सध्या पुढे ढकलण्यात आले आहेत. पुढील तारखा परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर कळविण्यात येतील, असे मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी कळवले आहे.
पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे आयोजित सर्वोत्तम दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार 'मौज ' या अंकाला जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार समारंभ मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. मात्र, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पुढे ढकलण्यात आला.
‘यदाकदाचित रिर्टन्स’ या नाटकाचा प्रयोग २६ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री ९.३० वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र, रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.