शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

त्यांच्याच बिल्डरांबरोबर भागीदाऱ्या

By admin | Published: February 18, 2017 3:39 AM

भाजपातील तिकिटे बिल्डरने दिल्याचा आरोप अजित पवार, नारायण राणे व राज ठाकरे यांनी केला आहे. परंतु, वास्तवामध्ये बिल्डरांबरोबर

पुणे : भाजपातील तिकिटे बिल्डरने दिल्याचा आरोप अजित पवार, नारायण राणे व राज ठाकरे यांनी केला आहे. परंतु, वास्तवामध्ये बिल्डरांबरोबर यांच्याच अनेक ठिकाणी भागीदाऱ्या आहेत. हेच मोठे बिल्डर आहेत. मग त्यांच्या पक्षातील तिकिटे कोणी दिली, असे जनतेने समजायचे? असा थेट सवाल करीत खासदार संजय काकडे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला शुक्रवारी जोरदार उत्तर देत विरोधकांवर थेट हल्ला केला.पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी धनकवडी-आंबेगाव पठार प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार भीमराव तापकीर, गोपाळ चिंतल, उमेदवार अभिषेक तापकीर, मोहिनी देवकर, वर्षा तापकीर व गणेश भिंताडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.काकडे म्हणाले, ‘‘मी १९८६ मध्ये व्यवसायात आलो. व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर राजकारणात आलो. परंतु, टीका करणारे अजित पवार, नारायण राणे व राज ठाकरे हे राजकारणातून व्यावसायिक झाले, हे संपूर्ण जनतेला माहीत आहे. मात्र, त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीही नाही. कारण, गेल्या २० ते २५ वर्षांत सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादीने काहीच केले नाही. त्याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पावधीत विकास योजना कार्यान्वित केल्या आहेत. विकासाच्या मुद्द्यावरच पुण्यातील निवडणूक भाजपा जिंकणार आहे. सर्व तिकिटे ही निवडून येण्याच्या क्षमतेवरच दिली असल्याने भाजपाचा विजय निश्चित झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली आहे.’’ दीर्घकालीन विकासासाठी पुण्यात भाजपाला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन दानवे यांनी केले.