पुणे: मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ (madhuri misal) यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आमदार मिसाळ यांनी विधानसभा अधिवेशनालाही हजेरी लावली होती.
कोरोनाची बाधा झाल्यानंतर आमदार मिसाळ यांनी माध्यमांतून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, सोमवारी करण्यात आलेली माझी कोविड टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे. सध्या मी होम आयसोलेशनमध्ये आहे. माझी प्रकृती चांगली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोविड टेस्ट करून घ्यावी. काळजी घ्या, सुरक्षित रहा.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. पुण्यातही कोरोनाबाधित रुग्णांसह ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच मास्कचा वापर करण्याचेही आवाहन केले जात आहे.