पुणे : पर्वती मतदारसंघात जोरदार सुरुवातीपासून चर्चेत अटीतटीची अशी तिरंगी लढाई होईल, अशी वाढणारी निवडणूक एकतर्फी झाली. २०२४चा पर्वतीचा निकाल हा एकतर्फी होऊन महायुतीच्या माधुरी मिसाळ यांनी सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी घेत १ लाख १८ हजार १९३ मतदान घेऊन विजयी ठरल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या अश्विन कदम यांना ६३ हजार ५३३ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार आबा बागूल यांना १० हजार ४७६ मते मिळाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या सुरेखा गायकवाड यांना ३ हजार ४२० मते मिळाली आहे. भाजपा उमेदवार माधुरी मिसाळ यांनी महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांचा दोनदा पराभव करीत ५४ हजार ६६० मतांची आघाडी मिळून विजयी मिळवला असून, चौथ्यांदा गड राखण्यात यश मिळवले आहे.
अशी आहेत यंदाची पर्वती आकडेवारी २०२४
एकूण मतदान : ३ लाख ६० हजार ९७४मतदान झाले : २ लाख ३ हजार २५२
त्यापैकी प्रमुख उमेदवार मिळालेली मतदान
महायुतीच्या माधुरी मिसाळ यांना १ लाख १८ हजार १९३ मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम यांना ६३ हजार ५३३ मते मिळाली तर अपक्ष आबा बागूल यांना १० हजार ४७६ मते मिळाली तर वंचितच्या सुरेखा गायकवाड यांना ३ हजार ४२० तर डमी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांना ३७८ मते मिळाली आहेत.
पर्वतीत लाडकी बहिणीचा प्रभाव
पर्वती विधानसभा मतदारसंघात पुरुषापेक्षा महिलांच्या मतदान संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यात पर्वती विधानसभेत १० हजार ०६५ मतदानाची अधिक नोंद झाली तर त्यात पुरुष ३ हजार ४८५ मतदानात वाढ झाली असल्याने पर्वतीत महिलाराज मतदानाचा टक्का वाढला असून, याचा फायदा भाजपा उमेदवारांना मिळाला आहे. त्यात लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिला मतदारांनी महायुतीला पसंती दिली.
यंदा पर्वतीत मंत्रिपद मिळणार
पर्वतीत मंत्रिमंडळाची वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये मिसाळ यांनी मंत्रिपद मिळाले, असा विश्वास व्यक्त करीत पक्ष जे ठरवेल ते मंत्रिपद घेऊन पर्वतीच्या जनतेच्या विकासासाठी यापुढे अधिक काम करणार असल्याचे माधुरी मिसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.