अर्धवट अवस्थेत बंद असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांना नको एवढा त्रास सहन करावा लागत आहे, सतत होणाऱ्या अपघातांमुळे काहींना जीवास मुकावे लागत आहे तर काहींना अपंगत्व येत आहे, जर ह्या कामाला लवकरात लवकर गती देऊन पूर्ण केले नाही तर या रस्त्यावर शिंदवणे गावच्या भजनी मंडळाच्या वतीने रस्त्यावर उतरून ‘भजन आंदोलन’ करण्यात येईल तसेच उपोषण करण्यात येईल, असा इशारा शिंदवणे गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य गणेश महाडिक यांनी आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी पुणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांना लेखी निवेदन देऊन दिला आहे.
पूर्व हवेलीत मुख्य रस्त्यांची संख्या जास्त आहे, त्यांच्या कामांची मंजुरीही मिळालेली आहे. मात्र ती सर्वच कामे अतिशय संथ गतीने चालू आहेत, तर काही अर्धवट अवस्थेत बंद आहेत. पूर्व हवेली तालुक्यातील राज्य मार्ग क्र. ११७ ने पूर्व हवेली व शिरूर तालुक्याला जोडणारा बेल्हा-जेजुरी-पाबळ हा महत्त्वाकांक्षी मार्ग तातडीने विकसित व्हावा यासाठी हायब्रीड ॲम्युनिटी प्रकल्पातून मंजुरी देण्यात आली होती. मात्र तीन वर्षे उलटून गले तरीही अद्याप हे काम संपले नसून अतिशय संथ गतीने सुरु आहे.
या मुख्य रस्त्यांच्या कामांना निधी मिळत नाही आणि ठेकेदारांना झालेल्या कामांच्या बदल्यात बिल मिळत नाही अशा स्थितीत लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे म्हणा की जनतेला दिलासा द्यायचाच नाही म्हणून हे अर्धवट रस्ते तालुक्याची डोकेदुखी ठरू लागले आहेत. भाजप सेना युती सरकारने मुख्य ग्रामीण मार्गांना विकासाची दृष्टी मिळावी म्हणून हायब्रीड अॅम्यनिुटी हे स्वतंत्र नवे हेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत निर्माण करुन या रस्त्यांची विकासाची संकल्पना ठेवली होती.
--
चौकट
कंत्राटदार आणि प्रशासनाची निष्क्रियता
या हायब्रीड अॅम्यनिुटी विभागाअंतर्गत अनेक रस्त्यांचा कायापालट झाला आहे. पूर्व हवेली तालुक्यात तत्कालीन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या प्रयत्नातून सप्टेंबर २०१७ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. मात्र रस्त्याचे ठेकेदार आणि प्रशासनाने मंजुरी प्रक्रियेला गती दिली नाही. बँक सिक्युरिटीचे कारण सांगून रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली नाही. पुढील महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यांच्या कामासाठी निधी तरतुदीला फारसे महत्त्व न दिले गेल्यामुळे निधीअभावी रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत तर काही बंद आहेत. बेल्हा-जेजुरी-पाबळ रस्त्याची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. या रस्त्यांची कामे संबंधित ठेकेदाराने पोट ठेकेदाराला दिल्याने कोरेगाव मूळ ते पिंपरी सांडस तर उरुळी कांचन ते शिंदवणे दरम्यान रस्ता अर्धवट राहिला आहे. रस्त्यावर काही ठिकाणी खडी अंथरल्याने हा रस्ता नागरिकांना वापरण्यास अतिशय जिकिरीचा झाला आहे. तीन वर्षे उलटून या रस्त्यांच्या कामांना निधीअभावी खोळंबा झाला आहे. विशेष म्हणजे या कामासंदर्भात विरोधी पक्षाकडूनही जाब विचारला जात नाही आणि सत्ताधाऱ्यांकडून तर याकडे पाहिलेही जात नाही त्यामुळे सामान्य माणूस मात्र असुविधांनी भरडला जातो.
230821\whatsapp image 2021-08-21 at 5.21.59 pm.jpeg
जेजुरी उरुळी कांचन रस्त्यावरील दुरावस्था वाहनचालकांना ठरतेय डोकेदुखी.