वाकडमधील सूर्या मदर अँड चाईल्ड सुपरस्पेशालिटी रुग्णालयात डाॅ. कपिल जाधव हे बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी एमबीबीएस, एमडी (बालरोग) हे पदवी शिक्षण घेतले आहे. २०१२ पासून ते बालरोगतज्ज्ञ म्हणून पुणे परिसरात कार्यरत आहेत. नुकत्याच जन्माला आलेल्या बालकांमध्ये काही व्यंग असेल, बाळामध्ये मेंदूविकार, हृदयविकार, यकृताचे आजार असतील तर त्यासंबंधी सर्व या उपचार या रुग्णालयात केले जातात. तसेच, आवश्यक शस्त्रक्रियाही केल्या जातात. महिलांसंबंधी सर्व आजारांवर या रुग्णालयात उपचार केले जातात. त्यामध्ये प्रसूती व स्त्रीरोग, अतिधोकादायक बाळंतपण, प्रजनन क्षमता आणि आयव्हीएफ, युरो-गायनॅकोलाॅजी, लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, भौतिक चिकित्सा यांचा समावेश आहे असेही डाॅ. जाधव यांनी सांगितले.
हृदयरोग, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलाॅजी), कर्करोगासंबंधी शस्त्रक्रिया, स्नायू व हाडांचे आजार, चाचण्या, मानसोपचार, सीटी-स्कॅन, सांधेदुखी, मूत्रविज्ञान अशा विविध आजारांशी संबंधित अत्याधुनिक उपचार रुग्णालयात केले जातात. १९८५ पासून सूर्या मदर अँड चाईल्ड सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचार दिले जात आहेत. रुग्णांनी आमच्यावर सातत्याने विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे रुग्णांसाठी अहोरात्र झटण्याची प्रेरणा आम्हाला मिळत आहे, असेही डाॅ. जाधव म्हणाले. २२ सप्टेंबर २०१७ रोजी रुग्णालयात अवघ्या २२ आठवड्यांच्या बाळाला वाचवण्यात यश आले. रुग्णालयातील १४ डाॅक्टर आणि ५० नर्स यांनी दिवसरात्र परिश्रम करून या बालकाचे प्राण वाचवले होते. तब्बल १३२ दिवस त्याच्यावर उपचार करण्यात येत होते. जन्माच्या वेळी या बाळाचे वजन अवघे ६१० ग्रॅम होते. डोक्याचा आकार २२ सेंमी आणि लांबी केवळ ३२ सेंमी होती. या बालकाने अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. रुग्णालयातील अत्याधुनिक व्यवस्थेमुळेच हे शक्य झाले असे डाॅ. जाधव म्हणाले.
रुग्णालयातील रुग्ण, कर्मचारी आणि सेवा देणाऱ्यांची सुरक्षा आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यानुसार कोरोना नियमांचे पालन, आपत्कालीन सुरक्षेची काळजी घेतली जाते. महिला आणि लहान मुलांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने सर्वोच्च वैद्यकीय कौशल्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाला संस्थेकडून वाव देण्यात येत आहे. त्यानुसार संस्था सातत्याने गुणवत्ता वाढवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे डाॅ. जाधव यांनी सांगितले. भविष्यातही रुग्णालय आणि मी स्वत: महिला आणि बाल आरोग्यासाठी कार्यरत राहणार आहे असेही ते म्हणाले.