शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रुग्णांची होतेय हेळसांड

By admin | Published: October 12, 2016 2:20 AM

कोंढवा खुर्द येथील महापालिकेचे स्व. मीनाताई ठाकरे प्रसूती आणि रुग्णालयात दैनंदिन रुग्णांची संख्या जास्त आणि डॉक्टर कमी असल्याने रुग्णांची

कोंढवा : कोंढवा खुर्द येथील महापालिकेचे स्व. मीनाताई ठाकरे प्रसूती आणि रुग्णालयात दैनंदिन रुग्णांची संख्या जास्त आणि डॉक्टर कमी असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते इतर ठिकाणी खर्च करून उपचार घेऊ शकतात; मात्र सर्वसामान्य रुग्णांचे मात्र हाल होत आहेत. कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द आणि येवलेवाडी भागातील हॉस्पिटल मुख्य रस्त्यावर आणि मध्यवर्ती सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने येथे दरदिवसाला रुग्णांची संख्या ३०० ते ३५० पर्यंत असते. गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, अल्पवयीन बालक यांची संख्या जास्त असून, त्यांच्यावर येथे मोफत उपचार केला जातो. तर, काहींना केवळ १० रुपये केसपेपर असल्याने सर्व सामान्य मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात येथे उपचार घेत असतात.परिसरात ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे आणि घाणीमुळे डास मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचा प्रादुर्भाव होऊन अनेक नागरिकांना सर्दी, ताप, थंडी, अंग व गुडघेदुखीचा त्रास होत आहे. चिकुनगुनिया आणि डेंगी आजाराचे अनेक रुग्ण येथे आढळत आहेत. त्यांना खासगी दवाखान्याकडे जावे लागते. तेथील खर्च पेलवत नसल्याने बिलासाठी सर्वसामान्य नागरिक विशेषत: विधवा महिला डोनेशन देणाऱ्या सामाजिक संस्थेकडे धाव घेत आहेत. दिवसाला पाच तरी रुग्णांचे गरीब नातेवाईक आर्थिक मदतीसाठी येतात. त्यांना शक्य तितकी आर्थिक मदत करत असल्याची माहिती मुस्लिम फाऊंडेशन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आजी गफूर पठाण यांनी दिली. सध्या चिकुनगुनिया आणि डेंगी सदृश्य रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने कायमस्वरूपी डॉक्टरांची संख्या वाढविण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.