कोट
डॉ. स्नेहा लुंकड (बोहरा)
गरोदरपणात पती दिव्यांश बोहरा, आई-वडिलांची इच्छा आणि आपल्या प्रामाणिक प्रयत्नातून समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आपण कुठलीही शैक्षणिक पात्रता प्राप्त केली असेल तर कोरोनात कर्तव्यात कसूर करू नये. असे केले तर आपण आपल्याला स्वतःलाच माफ करू शकणार नाही. सात महिन्यांची गरोदर असल्याचे भान कुठल्याही स्त्रीला २४ तास राहत असते. त्यामुळे त्या बाबतच्या सर्व तपासण्या सर्व काळजी अत्यंत सुरक्षितपणे घेत हे काम करत असताना दुहेरी आनंद होत आहे.
या कालावधीमध्ये क्लिनिकमध्ये येणाऱ्या सर्वांनीच मोलाचे सहकार्य केलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने क्लिनिकचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. नितीन बोरा, सहकारी अर्चना दिवटे, जमीर शेख, रोहित चंगेडिया यांनी सहकार्य केले.