तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या काही दिवसांपूर्वी बदल्या झाल्याने साधारण आठ ते दहा दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारीच नसल्याने मेडिकल प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना थेट ससून हॉस्पिटल पुणे येथे रेफर केले जात आहे.तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर असल्याने येथील ओपीडीचे रुग्ण तळेगावला पाठवले जात आहेत.तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांची १२ पदे रिक्त असल्याने उर्वरित १९ कर्मचाऱ्यांवर सध्या कामाचा मोठ्या प्रमाणावर ताण वाढला असून सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येला आरोग्य सेवा पुरवणे कठीण जात आहे.सध्या तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात कोविड लसीकरण मोहीम,आरटीपीसीआर चाचणी व अँटिजन चाचणी,लहान बाळांचे लसीकरण मोहीम साधारण ४२ सत्रांमध्ये राबवले जात आहे.गरोदर मातांची तपासणी,महिलांची प्रसूती,नियमित होणारी ओपीडी तसेच श्वानदंश,सर्पदंश रुग्णांवर उपचार अशा विविध कामांचा मोठा ताण येत आहे.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी,पारोडी,शिवतक्रार म्हाळुंगी,टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, कासारी, कोंढापुरी, बुरुंजवाडी, शिक्रापूर,सणसवाडी,दरेकरवाडी कोरेगाव-भीमा,वाडा -पुनर्वसन,डिंग्रजवाडी या सोळा गावांचा समावेश असून यातील ६ उपकेंद्रे आहेत.सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १ लाख ७ हजार ११० आहे.
तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्र- अपरात्री महिला प्रसूतीसाठी तसेच श्वानदंश व सर्पदंश झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर येतात, परंतु गेल्या दहा दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन जागा रिक्त असल्याने रुग्णांचे हाल होत असून या दोन दिवसात सर्पदंश झालेले चार रुग्ण उपचार घेण्यासाठी आले होते. या सर्पदंश झालेल्या रुग्णाचा प्राथमिक उपचाराअभावी मृत्यू झाल्यास याला जबाबदार कोण? रुग्णांची परीक्षा न पाहता आरोग्य विभागाने त्वरित रिक्त जागा भराव्यात.
-संदीप ढमढेरे,सामाजिक कार्यकर्ते, तळेगाव ढमढेरे
(स्वतंत्र चौकट –
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील मंजूर व रिक्त पदे...
वैद्यकीय अधिकारी - मजूर पदे २ , रिक्त पदे २.. आरोग्य सहायक - मजूर पदे २ , रिक्त पदे ०.
आरोग्य सहायिका - मंजूर पदे २, रिक्त पदे १.. औषध निर्माण अधिकारी - मजूर पदे १, रिक्त पदे ०.
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी - मंजूर पदे १, रिक्त पदे ०.. लिपिक – मंजूर पदे १, रिक्त पदे १.
शिपाई – मंजूर पदे ४, रिक्त पदे १.. आरोग्यसेविका – मंजूर पदे ७, रिक्त पदे ५.. आरोग्यसेवक – मंजूर पदे ६, रिक्त पदे २.. समोदय आरोग्य अधिकारी – मंजूर पदे ५, रिक्त पदे ०. अशा पद्धतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात ३१ पदे मंजूर असून त्यापैकी १२ पदे सध्या रिक्त आहेत.)
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह काही कर्मचाऱ्यांची बदली झालेली असल्याने अनेक पदे रिक्त आहेत,मात्र सर्व रिक्त पदे लवकरच भरली जातील.
-डॉ.दामोदर मोरे,शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी
: तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायरीवर उपचारासाठी वाट पाहत बसलेला सर्पदंश झालेला व्यक्ती.
080921\img-20210907-wa0004.jpg
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पायरीवर सर्पदंश झालेला रुग्ण उपचार याची वाट पाहत असताना