काही महिन्यांपूर्वीच ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या लोणी काळभोर व लोणी कंद या दोन पोलीस ठाण्यांचा समावेश शहर पोलीस आयुक्तालयात करण्यात आला. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर बीट मार्शल सेवाही सुरू करण्यात आली.
या वेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पंचायत समिती सदस्य हेमलता बढेकर, उरुळी कांचनचे सरपंच संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन आदी उपस्थित होते.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, उरुळी देवाची येथे मोठमोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. तेथे झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, यादृष्टीने बीट मार्शल गस्त सुरू करण्यात आली.