मनोहर बोडखे लोकमत न्यूज नेटवर्कपाटस : येथे इ. स. १७०० मध्ये बाजीरावने मस्तानीसाठी बांधलेली बारव (तलाव) सध्याच्या परिस्थितीत भग्नावस्थेत आहे. तेव्हा हा ऐतिहासिककालीन ठेवा जपण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. सुपा परगण्यात पाटस गावाला महत्त्व होते. मोगल काळात स्वाऱ्या करण्यासाठी पाटसला सर्व जाती-धर्माच्या सैन्याचे अधूनमधून वास्तव असायचे. त्यात मोगलांवर स्वारी करण्यासाठी बाजीरावबरोबर मस्तानीदेखील पाटसमध्ये वास्तव्याला असायची. बऱ्याचदा मस्तानीने घोड्यावरून स्वाऱ्या करीत मोगलांशी लढा दिला आहे. तेव्हा पाटसला मस्तानीला अंघोळीसाठी बाजीरावांनी गाववेशीच्या काही अंतरावर बारव बांधली आहे. या बारवला चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. चारही बाजूंनी दगडांच्या भिंतींना देवळ््या आहेत. एका देवळीत गणपतीची दगडात कोरलेली मूर्ती आहे. बारवचे बांधकाम घडवलेल्या दगडात आहे. मात्र बारवच्या भिंतींना काही ठिकाणी तडे पडत चालले आहेत.
पाटसला मस्तानीची बारव दुर्लक्षित
By admin | Published: May 23, 2017 5:22 AM