लीना सोनवणे ( वय ३५ ), ओम सोनवणे ( वय ७), (दोघेही राहणार स्वराज अपार्टमेंट , पाटस , ता. दौंड ) असे आत्महत्या केलेल्या मायलेकांचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार लीना सोनवणे यांच्यसह त्यांची मुलगी वैष्णवी (वय १०), मुलगा ओम हे घरी होते. दरम्यान लीना यांनी स्वयंपाक घराच्या छताच्या पंख्याला तर ओम याने त्याच्या बेडरुम मध्ये छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे सकाळी वैष्णवी हिला दिसले त्यानंतर घडलेली घटना वैष्णवीने तिच्या नातेवाईकांना कळविली. त्यानुसार नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी भाऊसाहेब शेलार (रा. केडगाव , ता. दौंड) यांनी पोलीसांना फिर्याद दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यवतचे पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पाटील , पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरगोजे, रामभाऊ घाडगे, सागर चव्हाण, प्रदीप काळे, विजय भापकर यांनी भेट दिली, असे पोलीसांंनी सांगितले.
पाटसला माय लेकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:11 AM