पिंपरी : पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी हा मार्ग तयार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी. तसेच निगडीत बहुउद्देशीय वाहतूक केंद्र उभारण्यास मंजुरी देण्याची मागणी भाजपाने केली आहे.केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली. पुणे महामेट्रोच्या वतीने पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित असून त्यास केंद्राची तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. मेट्रोचा पहिला फेज पिंपरीपर्यंतच होणार आहे. त्यामुळे शहराचा सत्तर टक्के भाग हा मेट्रोच्या सुविधेपासून वंचित राहणार आहे. पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेणेआवश्यक आहे.२०१५ मध्ये पुण्यामधील एका बैठकीत पिंपरी-स्वारगेट मेट्रोचा विस्तार निगडीपर्यंत करण्यास मंजुरी दिली होती.परंतु, काही कारणास्तव केंद्राने मंजुरी देताना पिंपरी-निगडीचा समावेश दुसºया फेजमध्ये केला आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना, संस्था, मानवी साखळी, आॅनलाइन याचिका माध्यमातून पाठपुरावा करत आहेत. पुणे विभागीय आयुक्तांनी नुकतेच महामेट्रो कंपनीला पिंपरी-निगडी मेट्रो विस्ताराचा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे. परंतु, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही.याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे म्हणाले, ‘‘निगडी ते पिंपरी सहा किलोमीटर विस्तार हा मेट्रोच्या दुसºया टप्प्यात होणार आहे. प्रकल्प अहवालानुसार मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी पाच वर्ष लागणार आहे. त्यानंतर दुसरी फेज सुरू होईल. पिंपरी-चिंचवड शहराकडे मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष आहे. आता मेट्रो निगडीपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये नेल्यास मोठ्याप्रमाणात विकास होईल.’’
पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यात यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 5:51 AM