शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

पवनेने घेतला मोकळा श्वास

By admin | Published: June 13, 2015 11:47 PM

पवना नदीच्या पात्रामध्ये धनेश्वर पुलाजवळ साठलेला गाळ महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काढला आहे.

पिंपरी : पवना नदीच्या पात्रामध्ये धनेश्वर पुलाजवळ साठलेला गाळ महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काढला आहे. त्यामुळे नदीचे पात्र खोल झाले असून, अडथळे दूर झाल्याने पाण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे नदीच्या पात्राने अनेक वर्षांपासून मोकळा श्वास घेतल्याची भावना पर्यावरणप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. चिंचवड गावातील महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिराजवळ पवना नदीवर पुलाचे बांधकाम करतेवेळी पाण्याचा अडथळा टाळणे गरजेचे होते. त्या वेळी जवळच पाणी अडविण्यासाठी साकव पद्धतीचा छोटा बंधारा बांधला होता. धनेश्वर पूल बांधताना या छोट्या बंधाऱ्यामुळे पाणी हवे तसे वळवून काम करणे शक्य होत होते. वास्तविक पुलाचे काम पूर्ण झाल्यावर हा बंधारा काही प्रमाणात खुला करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करताच बंधारा आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आला. परिणामी, अनेक वर्षांमध्ये नदीच्या प्रवाहासोबत आलेला गाळ, दगड या बंधाऱ्याला अडत राहिला. परिणामी, धनेश्वर पुलापासून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मोरया गोसावी समाधी मंदिर, लगतचा गणपती विसर्जन घाट ते पद्मजी पेपर मिलने बांधलेल्या छोट्या बंधाऱ्यापर्यंत हा राडारोडा साचत राहिला. त्यातून नदीचे पात्र अगदीच उथळ झाले होते. गणपती विसर्जन घाटाजवळ हे पात्र २ फूटही खोल राहिले नव्हते. त्यामुळे विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती पाण्यावरच उघड्या पडत असल्याचे चित्र कित्येक दिवस दिसून येत होते. (वार्ताहर)