पिंपरी : पवनानगर परिसरात एका घरात व पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून १७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उपविभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २५) लोणावळा ग्रामीण पोलिस पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी विजय शिवाजी कालेकर (वय ४८, रा. काले), निवृत्ती दत्तू घायाळ (६०, रा. सावंतवाडी), किसन दगडू निकम (४६, रा.निकमवाडी), निवृत्ती कालेकर (६०, रा.काले), विठ्ठल भिवा ठाकर (४७, रा.येळसे), शांताराम मारुती कदम (५६, रा.काले), रोहिदास बाबू ठेले (५३, रा.मळवंडी), दत्तू किसन बोडके (६५, रा.काले), तानाजी शिवाजी कालेकर (५२, रा.काले), सुरेश देवराम भालेराव (५१, रा.काले), खंडू पंडू कालेकर (६०, रा.काले), अंकुश दुंदाजी कालेकर (५५, रा.काले), संजय गोविंद दांगट (५२, रा.शेवती), अशोक परशुराम कालेकर (५१, रा.काले), वसंत अबू तुपे (५०, रा.जवण), चंद्रकांत येवले, विजय तिकोणे, अरुण येवले यांना पोलिसांनी ताब्यात घेत ७ लाख ५ हजाराचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन राऊत, शुभम चव्हाण, भारत भोसले, सागर बनसोडे, नितेश कवडे, सचिन गायकवाड, रईस मुलाणी, सिद्धेश वाघमारे यांनी कारवाईत सहभाग घेतला.