राज्य शासनाने सीओईपीच्या विस्तारासाठी चिखली येथे ११.३० हेक्टर जागा दिली आहे. या विस्तारित केंद्रात सीओईपीज् रीसर्च ॲण्ड इनोव्हेशन पार्क सुरू होणार आहे. या केंद्राद्वारे प्रस्तावित सर्व अभ्यासक्रम हे कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित तत्त्वावर संस्थेमार्फत चालविण्यास मान्यता दिली जात असल्याचे राज्य शासनाने शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
सीओईपीच्या विस्तारित केंद्रात पहिल्या टप्प्यात "सेंटर फॉर डाटा सायन्स ॲण्ड मशिन लर्निंग'' आणि सेंटर फॉर रेबोटिक्स् ॲण्ड अर्टिफिशिकल इंटनलिनिजन्स ही दोन उत्कृष्टता व विकास केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. ही दोन केंद्र कार्यरत झाल्यानंतर उर्वरित केंद्रास प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे. या केंद्रातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असणा-या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाचा खर्च संस्थेला शैक्षणिक शुल्कातून भागवावा लागणार आहे.