शिरगाव : पवनानदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये धोबीघाट बांधून आंघोळ, कपडे धुण्यासाठी व गावातील इतर सांडपाणी याचा वापर झाल्यावर हे पाणी धोबीघाटात शुद्ध करून नंतर नदीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात गोडुंब्रे येथे रविवारी भूमिपूजनाने करण्यात आली. सदर प्रकल्पामध्ये नदीकाठच्या ३२ गावांचा समावेश करून प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वेळी पावन पवनाचे प्रवीण लडकत, ग्रामप्रबोधिनीचे प्राचार्य व्यंकट भताने, मनोज पुरावे, सुनील शिंदे, हेमंत वाटावे, रवी सावंत, विजय वायदंडे, डॉ. विश्वास येवले, राजीव भावसर, धनंजय गोडबोले, रमेश सरदेसाई, मोहन गायकवाड, प्रशांत हंबर, लक्ष्मिकान्त भवसागर, सरपंच रेखा सावंत, उपसरपंच नर्मदा येवले, माजी सरपंच राम सावंत, गणेश सावंत, माजी उपसरपंच आशालता चोरघे, संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्या सारिका कदम, खराडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामप्रबोधिनी साळुंब्रे यांच्या प्रयत्नातून पवनामाई उत्सवांतर्गत २० वर्षांपासून चळवळ सुरू आहे. याच संकल्पनेतून पवनाकाठच्या गावांचा विकास व गावे सांडपाणीमुक्त व कचरामुक्त करण्याच्याला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थांच्या माध्यमातून प्रकल्प हाती घेण्यात आला. (वार्ताहर)वृक्षलागवड : स्वच्छ, सुंदर गाव संकल्पनाया उपक्रमांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्रदूषणमुक्त नदीघाट, आदर्श शाळा विकास करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, वृक्षलागवड, स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेला तीन संगणक संच व एलसीडी प्रोजेक्टर भेट देण्यात आला. गावात बंधारा बांधून सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करून नदीत सोडण्यात येणार आहे. घर व परिसर स्वच्छ, तर गाव स्वच्छ अन् गाव स्वच्छ तर नदी स्वच्छ या संकल्पनेतून आर्ट आॅफ लिव्हिंगचे कार्यकर्ते गावातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना प्रबोधन करत असून, स्वच्छतेची शपथ देत आहेत. येथील भावसार व्हीजन, जलदिंडी प्रतिष्ठान, सिटीझन फोरम, नाम फाउंडेशन, कला जनसेट, आर्ट आॅफ लिव्हिंग, म्याथ्यूर प्लांट, जेएसपीएम संस्था, निसर्ग मित्र, संस्कार प्रतिष्ठान, ग्राहक पंचायत आदींसह २३ संस्था, तसेच परिसरातील ग्रामप्रबोधिनी विद्यालय, प्रकाश देवळे विद्यालय, पंचक्रोशी हायस्कूल, तुळजाभवानी विद्यालय आदीसह जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांचा हातभार लागणार आहे
पवना नदी होणार प्रदूषणमुक्त
By admin | Published: March 28, 2017 2:38 AM