शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं; भाजप नेत्याने व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 4:40 PM

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील सदस्य आमने-सामने आले असून एकमेकांवर घणाघाती आरोप केले जात आहेत.

Baramati Lok Sabha ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढतीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील सदस्य आमने-सामने आले असून एकमेकांवर घणाघाती आरोप केले जात आहेत. एकसंध कुटुंब म्हणून ज्या कुटुंबाची राज्याच्या राजकारणात ओळख होती, त्या पवार कुटुंबात राजकीय युद्ध सुरू झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त करत हे कुटुंब निवडणुकांनंतर पुन्हा एकत्र यावं, अशी आपली इच्छा असल्याचं सांगितलं आहे.

पवार कुटुंबातील राजकीय संघर्षाबद्दल संजय काकडे म्हणाले की, "एकमेकांचा इतका आदर करणारं कुटुंब आज अशा थराला जात आहे. त्यामुळे मी चुकीच्या क्षेत्रात आहे की काय, असं मला स्वत:ला वाटायला लागलं आहे. परंतु बघू... वेळ-काळ असते, निवडणुकीत असं बोललं जातं. मात्र निवडणुकीनंतर हे कुटुंब एकत्र यावं, अशी माझी स्वत:ची इच्छा आहे. त्यांचे आधीचे जे स्नेहभावाचे संबंध होते, ते तशेच राहावेत," अशी इच्छा काकडे यांनी व्यक्त केली आहे.

"सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी प्रयत्न करणार"

एकीकडे पवार कुटुंबाचं मनोमिलन व्हावं, अशी इच्छा व्यक्त करत असतानाच आपण बारामती लोकसभा मतदारसंघात युती धर्माचं पालन करणार असल्याचंही संजय काकडे म्हणाले. "बारामतीत सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत. पुढील काही दिवसांत मी माझी सर्व कामे आटोपून २८ तारखेपासून बारामतीत जाणार आहे. महायुतीचा घटकपक्ष म्हणून तिथं सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी प्रयत्न करणं, ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करून आम्ही सुनेत्रावहिनींचा विजय नक्कीच सोपा करू," असं काकडे यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, संजय काकडे यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकांनंतर खरोखरच पवार कुटुंबातील सदस्यांचं मनोमिलन होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४