पुणे : पावसाचे आपल्या आयुष्याशी अनोखे नाते निर्माण झालेले असते. प्रत्येकाची पावसाशी जोडलेली एक कहाणी, एक आठवण असते. कधी पाऊस रोमांचक वाटतो तर कधी रौद्ररुप धारण करतो. पावसाशी जुळलेली एका कुटुंबाची, एका गावाची कथा लघुपटातून रंजक पध्दतीने मांडण्याचा अनोखा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे. मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘पावसाचा निबंध’ हा लघुपट शुक्रवारी (१३ एप्रिल) लॉस एंजेलिस चित्रपट महोत्सवात दाखवला होणार आहे. २५ मिनिटे कालावधीच्या या लघुपटाचे चित्रिकरण मुळशी परिसरात झाले आहे.‘पिस्तुल्या’ लघुपटानंतर नऊ वर्षांनी नागराज मंजुळे यांनी ‘पावसाचा निबंध’ हा दुसरा लघुपट दिग्दर्शित केला आहे. ‘पिस्तुल्या’ या लघुपटाला मिळालेल्या पारितोषिकांमुळे नागराज मंजुळे हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले.
लॉस एंजेलिसमध्ये झळकणार पावसाचा निबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 1:15 PM
नागराज मंजुळे यांनी तब्बल नऊ वर्षांनी लघुपट दिग्दर्शनात कमबॅक केले आहे. पावसाशी असलेले प्रत्येकाचे अनोखे नाते या लघुपटात दाखवले आहे.
ठळक मुद्दे‘पिस्तुल्या’ नंतर नऊ वर्षांनी नागराज मंजुळे यांनी ‘पावसाचा निबंध’ हा दुसरा लघुपट दिग्दर्शित