पुणे - राज्य सरकारने 26 जिल्ह्यांमध्ये निर्बंध हटवले असून रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वगळण्यात आलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे, पुणेकर व्यापारी सरकारवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रशासन व राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. तसेच, येथील स्थानिकांनाही धरणे आंदोलन करण्याचे सूचवले आहे. त्यानंतर, आता अमृता फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं टीका केली आहे.
अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्या बोलता होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करून खरेदी करावी. राज्यात अनेक ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे व्यवहार सुरू झाले आहेत. पुण्यात फक्त ४ टक्के रुग्णसंख्या असतानाही पुणे खुलं का झालं नाही? मुंबईतील निर्बंध हटवण्यात आले आहेत, तर पुण्यातील का नाही? त्यासाठी तुम्ही धरणे धरायला पाहिजे”, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना केलं. त्यावर, आता पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.
रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अमृता यांनी पुणेकरांना धरणे आंदोलन करण्याचा सल्ला दिला होता. त्यावरुन, चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना टोला लगावला आहे. पुण्यावर नको तर गाण्यावर लक्ष द्या, असे म्हणत चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना लक्ष्य केले. “रुग्णसंख्या अटोक्यात आल्यावर लोकांना बाहेर पडण्याचे अवाहन करायचं आणि पुन्हा रुग्ण संख्या वाढली की सरकारवर खापर फोडायंच. डबल ढोलकी वाजवण्याचे काम अमृता वहिनी करतात. पुणेकरांनी काय करयांच आणि काय करु नये, हे सांगण्यापेक्षा त्यांनी आपल्या गाण्याच्या छंदावर लक्ष द्यावं, अशी बोचरी टीका रुपाली चाकणकर यांनी केली.
नावडतीचं मीठ आळणी
कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला. मात्र, मोजक्याच शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही केला