हित समन्वय समितीची मागणी
बारामती :वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेऊन सभासदांना सन २०२०-२१ चा लाभांश द्या अशी मागणी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघ (कै. शिवाजीराव पाटील गट),बारामती तालुका प्राथमिक शिक्षक समिती, बारामती नगर परिषद प्राथमिक शिक्षक संघ, बारामती तालुका अपंग कर्मचारी संघटना यांच्या सभासद हित समन्वय समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बारामती तालुका शिक्षक सोसायटीच्या अध्यक्षा व संचालक मंडळाला निवेदन देण्यात आले आहे. जून महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन सभासदांना लाभांश वितरित करण्याची बारामती तालुका शिक्षक सोसायटीची गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे.परंतु मागील वर्षी कोरोनामुळे ही परंपरा खंडित झाली.मागील वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा विहित मुदतीत होऊ शकली नाही.त्यामुळे सभासदांना हक्काचा लाभांश मिळणेसाठी माहे आॅक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागली.
सद्य:स्थितीत सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांना मर्यादित संख्येची अट आहे. त्यामुळे नियमित वार्षिक सर्वसाधारण सभा कधी होईल ते निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सभासदांना हक्काचा लाभांश मिळणेसाठी वाट पाहावी लागणार आहे. तसे होऊ नये या करिता संचालक मंडळाने मागील वर्षीप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेऊन सभासदांना लवकरात लवकर लाभांश वाटप करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.यावेळी हनुमंत शिंदे,आबासाहेब जगताप,सुरेंद्र गायकवाड,सचिन हिलाळ, अविनाश कवडे,बजरंग जाधव,विकास कंकाळ उपस्थित होते.
———————————————